Milind Gawali: 'कपड्यांना किती महत्व द्यायचं..', मिलिंद गवळी जळगावकरांविषयी स्पष्टच बोलले

Milind Gawali
Milind GawaliEsakal

मराठी मनोरंजन विश्वात अनेक कलाकार आहेत पण प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्याचं काम काही क्वचित कलाकारांना येत. असचं एक नाव म्हणजे मिलिंद गवळी. मराठी मनोरजंन विश्वातील एव्हरग्रीन अभिनेते म्हणून मिलिंद गवळी ओळखले जातात. ते सध्या आई कुठे काय करते मालिकेतून प्रेक्षकांच मनोरंजन करत आहेत. त्याच्या मालिकेतील अनिरुद्ध या पात्रास प्रेक्षक भरभरुन प्रेम देत आहेत.

Milind Gawali
SS Rajamouli: 'सिंधू संस्कृतीवर चित्रपट बनवण्याचे होते स्वप्न मात्र पाकिस्तानने..', राजामौलींनी केला धक्कादायक खुलासा..

अभिनयाबरोबरच मिलिंद हे सोशल मिडियावर देखील खुप सक्रिय असतात. वेळोवेळी त्याच्या भावना काही रंजक किस्से ते पोस्टच्या माध्यमातुन चाहत्याप्रर्यंत पोहचवत असतात. नुकतच त्यांनी त्याच्या "आर आर आबा आता तरी थांबा" या चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्याचबरोबर त्यांनी या पोस्टमधुन एक मोलाचा सल्लाही दिला आहे.

या चित्रपटात मिलिंद गवळी यांच्या व्यतिरिक्त प्रिया बेर्डे, सतीश तारे, नागेश भोसले, रवींद्र बेर्डे, सविता मालपेकर, अमरापूरक, सुरेखा कुडची, विकास समुद्रे, तेजा देवकर आदी कलावंत आहेत. प्रा. बालाजी वाघमोडे यांची कथा व पटकथा आहे. संगीत अवधूत गुप्ते यांचे आहे. छायाचित्रण संजय मेमाणे यांचे आहे.

Milind Gawali
Eknath Shinde's first reaction after getting Shiv Sena and Dhanushya: एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि धनुष्यबाण मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया

तर हा किस्सा सांगण्याच कारण होतं त्यांनी केलेलं फोटोशुट. यावेळी त्यांनी त्याच्या कपड्याविषयी सांगतांना हा किस्सा चाहत्यासोबत शेअर केला आहे. व्यक्ती आपल्या आयूष्यात कपड्यांना किती महत्व देतता अन् किती द्यायला हवं हे त्यांनी या पोस्टमधुन सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

ते म्हणतात की, आपल्याकडे कपड्यांच्या बाबतीत किती तफावत आहे याची कल्पना सुद्धा करता येणार नाही.

'मी जळगावला सदाशिव अमरापुरकरांचा "आर आर आबा आता तरी थांबा" नावाचा चित्रपट करत होतो, ‘वाकोद’ या गावांमध्ये शूटिंग चालू होतं, त्या गावात आठवड्यातनं दोनच वेळा पाणी यायचं, त्यामुळे असलेले पाणी लोकं जपून जपून वापरायचे , गावातल्या एका घरामध्ये आमच्या बसायची सोय केली होती, त्या घराचा मालक माझ्या शी बोलायला आला, म्हणाला की "माझ्याकडे खूप सदरे (शर्ट) आहेत, माझी इच्छा आहे की त्यातला एक सदरा तुम्ही घालावा", मी त्यांना म्हटलं मला तुमचा सदरा नाही घालता येणार, आमचे शूटिंगला घालायचे कपडे ठरलेले असतात,

"माझ्याकडे खूप सदरे आहेत" हे ऐकल्यावर माझं कुतूहल वाढलं , मी त्यांना विचारलं खूप म्हणजे नेमकी किती सदरे आहे तुमच्या कडे , ते म्हणाले “तीन” आहेत.

त्या माणसाला "तीन" सदरे म्हणजे खूप वाटतात याचीच मला खूप आश्चर्य वाटलं,

आणि इकडे मुंबईमध्ये माझ्या एका मित्राकडे गेलो होतो,

तो मला म्हणाला "मी काय कार्यक्रमाला येऊ शकत नाही कारण माझ्याकडे घालायला कपडे नाहीये" मी म्हटलं अरे एखादा चांगला शर्ट असेल बघ तो घाल, तो म्हणाला ये तूच बघ आणि सांग मला, त्याने मला त्याचा wardrobe उघडून दाखवला,

Milind Gawali
PS 2 Box Office: ऐश्वर्या रायच्या 'पोनियिन सेल्वन 2' ची गरुड झेप! तिनचं दिवसातच पार केला इतक्या कोटींचा टप्पा

त्यामध्ये जवळजवळ 40-45 शर्ट्स होते

Louis Vuitton , Versace, Gucci, Tommy Hilfiger, Raymond, Allen Solly, Arrow. या ब्रँडेड कंपनीचे, आणि तो मला म्हणत होता की माझ्याकडे कपडेच नाहीयेत,

किती गंमत आहे बघा वाकोदच्या एका माणसाला तीन सदरे पण खूप आहेत असं वाटतं,

आणि इथे फिनिक्स मॉल मध्ये सतत शॉपिंग करणाऱ्याला

माझ्याकडे काही कपडेच नाहीयेत असं वाटतं.'

याच पोस्टमध्ये पुढे ते म्हणतात की, 'कपड्यांच्या बाबतीत मी स्वतःला खूप नशीबवान समजतो, कारण आजपर्यंत मला जितकी गरज होती तितके कपडे माझ्याकडे नेहमी असतात, कदाचित त्याचं कारण मी त्या कपड्याची खूप कदर करतो, प्रत्येक कपडा खूप व्यवस्थित वापरतो, वर्षानुवर्ष माझ्याकडे कपडे टिकतात, कपडे विकत घेतानाच खूप विचार करून मी ते घेतो, कमीत कमी पाच वर्ष मी तो वापरणार आहे या उद्देशाने घेतो. तरीसुद्धा गरजेपेक्षा जास्त कपडे असू नयेत, याची जाणीव व्हायला लागली आहे मला.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com