Milind Soman : असाही वाढदिवस! मिलिंद सोमण १७ हजार फूट उंचीवर पत्नीचे पाय पकडतो तेव्हा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Milind Soman Latest News

Milind Soman : असाही वाढदिवस! मिलिंद १७ हजार फूट उंचीवर पत्नीचे पाय पकडतो तेव्हा...

Milind Soman Latest News अभिनेता मिलिंद सोमणने (Milind Soman) पत्नी अंकिता कोंवरच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत रोमांचक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये दोघेही समुद्रसपाटीपासून १७ हजार उंचीवर पोझ देताना दिसत आहेत. मिलिंदच्या फोटोवरून असे दिसते की त्याने लडाखमधील कांगरूला भेट दिली आहे. मात्र, त्यानी शेअर केलेल्या एका फोटोवरून प्रश्न उपस्थित होत आहे.

फोटोंमध्ये मिलिंद जीन्स-जॅकेटमध्ये नेहमीप्रमाणेच देखणा दिसत आहे. आसामच्या संस्कृतीचे प्रतीक असलेला लोकप्रिय गमचाही गळ्यात दिसतो. अंकिता ही नॉर्थ-ईस्टची आहे. अंकिता पिवळा जॅकेट आणि निळ्या लोअरमध्ये खूप सुंदर दिसत आहे. एका फोटोमध्ये मिलिंद आणि अंकिता एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये अंकिता उभी आहे आणि मिलिंद (Milind Soman) पाय धरून बसलेला आहे. या फोटोवरूनच युजर्सच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहे.

अंकिताचा बुधवारी वाढदिवस होता. फोटो शेअर करताना मिलिंदने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझी प्रिये, मला माहीत आहे की काल तुझा चांगला वाढदिवस झाला. मी तिथेच होतो!!! समुद्रसपाटीपासून १७,००० फूट उंचीवर नवीन वर्षाची किती छान आणि सुंदर सुरुवात झाली आहे. मी दरवर्षी अधिक प्रेम करीत राहीन. तू स्वप्नात पाहिलेल्या सर्व चांगल्या आणि अद्भुत गोष्टी पूर्ण व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे. तू सर्वोत्तम आहे.’

हेही वाचा: Alia Bhatt : आलियाचे प्रेग्नेंसी लूक खूपच स्टायलिश

अंकिता नवऱ्याच्या अशा सुंदर पोस्टवर गप्प कशी बसेल? ती उत्तर देत म्हणाली, १७,००० फूट उंची तुमच्यासोबत चांगली वाटली. यासोबतच अंकिताने हार्टचा एक इमोजी देखील पोस्ट केला. ती मिलिंद सोमणपेक्षा वयाने २५ वर्षांनी लहान आहे. परंतु, प्रेमाचं काय, प्रेम वय बघून होत नाही. मिलिंद खूप साहसी आहे आणि अंकिताही त्याला पूर्ण पाठिंबा देते. त्यामुळेच त्यांची लव्ह लाईफही खूप साहसी आहे.

फोटोवरून युजर्सच्या मनात मात्र विविध प्रश्न उपस्थित होत आहे. मिलिंद सोमणने पाय का पकडले, असा प्रश्न विचारला. तसेच अनेकांनी प्रश्नाचा भडिमार केला. कदाचित ‘अंकिता, तू माझे सर्वस्व आहे’ असे सांगण्याची त्याची पद्धत असावी असे एकाने म्हटले.

Web Title: Milind Soman Birthday Ankita Konwar Height 17000 Feet Photo Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Birthdaymilind soman