विक्रम गोखलेंच्या वक्तव्याचा निषेध करावा तितका कमीच- यशोमती ठाकूर | Vikram Gokhale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vikram Gokhale and Yashomati Thakur

विक्रम गोखलेंच्या वक्तव्याचा निषेध करावा तितका कमीच- यशोमती ठाकूर

देशाच्या स्वातंत्र्याबाबत अभिनेत्री कंगना राणावतने Kangana Ranaut केलेल्या वादग्रस्त विधानावरून देशभर तीव्र पडसाद उमटत असताना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले Vikram Gokhale यांनी रविवारी तिच्या वक्तव्याचं समर्थन केलं. यावरून पुन्हा एक नवा वाद निर्माण झाला आहे. 'आपल्या वक्तव्याचा निषेध करावा तितका कमीच आहे', अशी प्रतिक्रिया राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत विक्रम गोखलेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

यशोमती ठाकूर यांचं ट्विट-

'विक्रमजी, आपल्या वयाचा आदर आहे, मात्र स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करण्याचा अधिकार आपल्याला नाही. आपली भक्ती एखाद्या नेत्यावर-पक्षावर असू शकते. पण हा देश, स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान त्यापेक्षा कैकपटीनं मोठं आहे. आपल्या वक्तव्याचा निषेध करावा तितका कमीच आहे,' असं ट्विट यशोमती ठाकूर यांनी केलं.

हेही वाचा: विक्रम गोखलेंची 10 धक्कादायक वक्तव्यं...; एकदा वाचाच

कंगना राणावत म्हणाली ते खरं आहे, अशा शब्दांत गोखले यांनी समर्थन केलं. स्वातंत्र्य मिळवण्यााचा प्रयत्न करणाऱ्या योद्धांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली. ब्राह्मण महासंघातर्फे अमृतमहोत्सवानिमित्त गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोखले यांनी राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राजकारणातील खेळ इतक्या विचित्र स्तरावर पोहोचले आहेत की, त्यामध्ये महाराष्ट्रातील मराठी माणूस भरडला जात आहे. संकटाच्या कड्यावरून देशाला मागे खेचायचं असेल आणि हे चुकलेलं गणित सुधारायचं असेल तर भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र आलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

loading image
go to top