"भाई, हर चीज का बदला तो लेके रहेंगे"; मिर्झापुरचा 2 भाग पहिल्यापेक्षा अधिक कडक

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 23 October 2020

प्रेक्षकांनी मिर्झापुरच्या 2 भागासाठी दोन वर्षे प्रतिक्षा केली. आता तो भाग अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली आहे. पहिल्या भागाचा मोठ्या रहस्यमय पध्दतीने झालेला शेवट त्या हत्येच्या सुडाचा प्रवास 2 -या सीझनमध्ये पाहता येणार आहे.

मुंबई - मिर्झापुरचा पहिला भाग प्रचंड लोकप्रिय झाल्यानंतर त्याच्या दुस-या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. हा सीझन कधी प्रदर्शित होतो याकडे त्यांचे लक्ष लागले होते. शुक्रवारी तो प्रदर्शित झाल्यानंतर लाखो प्रेक्षकांनी पाहिला. आताचा सीझनही पहिल्या भागापेक्षा अधिक रंगतदार बनविण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. क्राईम, थ्रिलर, सस्पेंन्स या भागात मोडणा-या या सीरीजकडे सेक्रेड गेम्स नंतर   टॉपची वेबसीरीज म्हणून पाहिले जात आहे.

प्रेक्षकांनी मिर्झापुरच्या 2 भागासाठी दोन वर्षे प्रतिक्षा केली. आता तो भाग अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली आहे. पहिल्या भागाचा मोठ्या रहस्यमय पध्दतीने झालेला शेवट त्या हत्येच्या सुडाचा प्रवास 2 -या सीझनमध्ये पाहता येणार आहे. पूर्व भागातल्या उत्तरप्रदेशातील मिर्झापुर गावातील लढाई अधिक अटीतटीची झाली आहे. या नव्या भागाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचवली आहे. मारधाडीचे प्रसंग, प्रभावी संवाद, लक्ष वेधुन घेणारे छायाचित्रण, दमदार कथानक, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे यातला अभिनय यामुळे प्रेक्षक सुरुवातीपासूनच या मालिकेचा भाग होऊन जातो. त्यामुळे सेक्रेड गेम्सप्रमाणे ही वेबसीरीज कमालीची लोकप्रिय झाली आहे. 

मिर्झापुरच्या 2 -या भागानेही प्रेक्षकांना निराश केलेलं नाही. त्यांच्या अपेक्षेला दिग्दर्शकाने पुर्ण केले आहे. हे आपल्याला ही वेबसीरीज पाहताना जाणवते. पहिल्या भागाच्या शेवटी मुन्ना त्रिपाठी (दिव्येंदु शर्मा) याने बबलु पंडित (विक्रांत मैसी), स्वीटी (श्रेया पिळगावकर) यांना गोळ्या घालून मारले आहे. आता तिथुनच मिर्झापुरच्या 2 भागाला सुरुवात होते. आता आपल्या भावाच्या हत्येचा सुड घेण्यासाठी गोलु गुप्ता,गुड्डु पंडित तयार झाले आहेत. कालीन भाई (पंकज त्रिपाठी) मिर्झापुरचा सगळ्यात ताकदवर व्यक्ती म्हणुन परिचित आहे. त्याचा आपल्या भागात दरारा वाढत चालला आहे. गावातील बरेचजण त्याला दबकून आहे. कालीन भाईला पुर्ण शहरावर आपली सत्ता आणि अधिकार गाजवायचा आहे. 

दुस-या भागातील कथानक हे मिर्झापुर वरुन सुरु होऊन ते लखनऊ पर्यत येऊन पोहचले आहे. रतिशंकर यांना मारल्यानंतर आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शरद (अंजूम शर्मा) हा उतावीळ झाला आहे.त्याला काही करुन गुड्डू पंडितला संपवायचे आहे. गुड्डूने भरदिवसा शरदच्या वडिलांची हत्या केली होती. सध्या दोन एपिसोड रिलिज झाले आहेत. त्यावरुन तरी हा भाग कमालीचा रंगतदार होणार असल्याचे सांगता येईल. कथेने वेगळे वळण घेण्यास सुरुवात केली आहे. या मालिकेतील बाबुजी (कुलभुषण खरबंदा), रसिका दुग्गल आणि पंकज त्रिपाठी यांचा अभिनय प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. . 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mirzapur 2 has started streaming on Amazon Prime Video