Miss World 2021:फर्स्ट रनरअप ठरलेल्या अमेरिकन श्री सैनीचं लुधियाना कनेक्शन

हार्ट पेशंट ते चेहऱ्याच्या सर्जरीपर्यंतच्या सगळ्या अडचणींवर मात करत श्री सैनीनं मिस. वर्ल्ड स्पर्धेत य़श संपादन केलं आहे.
Miss World 2021-first runnerup- Shree Saini
Miss World 2021-first runnerup- Shree SainiGoogle

'मिस वर्ल्ड २०२१' चा मुकूट पोलंडच्या करोलिना बिलावस्काने पटकावल्याची बातमी जगभरात वाऱ्यासारखी पसरली अन् भारतीयांचा मात्र हिरमोड झाला खरा. पण एक अशी बातमी स्पर्धेशी संबंधित कानावर पडली अन् भारतीयांची छाती अभिमानानं फुलून आली. प्यूर्तो रिको के कोका-कोला म्यूझिक हॉल मध्ये आयोजित केल्या गेलेल्या या स्पर्धेत फर्स्ट रनर अप बनली आहे अमेरिकेची श्री सैनी. श्री सैनी भारतीय वंशाची अमेरिकन नागरिक आहे. सुरुवातीपासून मिस.वर्ल्डचा खिताब सैनी पटकावेल असं अनेकांचं मत होतं.ती सोशल मीडियावर भरपूर सक्रिय पहायला मिळते. तिचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत. तिचे चाहते फक्त अमेरिकेतच नाहीत तर भारतातील लोकांनाही तिनं जिंकावं असं वाटत होतं.

श्री सैनी ही लुधियाना,पंजाबची रहिवासी आहे. ती जेव्हा पाच वर्षाची होती तेव्हा तिचं संपूर्ण कुटूंब वॉशिग्टन डीसी ला स्थलांतरित झालं. तिथं गेल्यानंतर तिचं आयुष्य खूप खरडतर राहिलं. आरोग्याविषयक अनेक तक्रारी तिला निर्माण झाल्या. वयाच्या १२ व्या वर्षीच तिला कायमस्वरुपी पेसमेकर बसवण्यात आलाय. तिला एक दुर्मिळ हृद्यरोग असल्याचं बोललं जात आहे. बेटर इंडियानं प्रकाशित केलेल्या एका लेखानुसार तिची ओपन हार्ट सर्जरी देखील झाली आहे. आणि तेव्हाच हा पेसमेकर हृद्यात बसवण्यात आला आहे. पण इथेच अडचणींनी तिचा पाठलाग सोडला नाही. एका भयानक अपघातात तिचा चेहरा जबरदस्त जखमी झाला होता. पण तरिही त्यावर मात करून तिनं उंच भरारी घेतल्याचं सिद्ध झालंय.

मिस वर्ल्ड च्या स्पर्धेचा अंतिम सोहळा ज्या दिवशी होता त्याच्या एक दिवस आधी सैनीनं आपल्या लहानपणीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यात डोक्यावर मुकूट घालून तिला अगदी मिस वर्ल्ड सारखं तयार केलं गेलं होतं. पोस्टला तिनं कॅप्शन दिलं होतं की,''मिस वर्ल्ड सुरू झालं! जेव्हा मी ६ वर्षांची होते,तेव्हा मी मिस.वर्ल्ड जसा गाऊन परिधान करते अगदी तसाच गाऊन घातला होता. कारण मिस.वर्ल्डला एका सुपरहिरोच्या रुपात पाहिलं होतं. मला हा खिताब मनापासून जिंकायचाय''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com