esakal | सिद्धार्थ-मितालीने लग्नाआधीच साजरा केला ‘पाडवा’, फोटो शेअर करत मिताली म्हणाली..
sakal

बोलून बातमी शोधा

siddharth mitali

सिद्धार्थ-मिताली हे सोशल मिडियावरही तितकेच ऍक्टीव्ह असतात.२०१९ मध्ये मोजक्याच कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला होता. आता तर दोघांनी लग्नाआधीच पाडवा सेलिब्रेट केल्याचं त्यांच्या पोस्टमधून दिसून येतंय.  

सिद्धार्थ-मितालीने लग्नाआधीच साजरा केला ‘पाडवा’, फोटो शेअर करत मिताली म्हणाली..

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- मराठीतला ‘चॉकलेट बॉय’ अशी ओळख असलेला अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील क्युट कपलपैकी एक आहेत. सिद्धार्थ-मिताली हे सोशल मिडियावरही तितकेच ऍक्टीव्ह असतात.२०१९ मध्ये मोजक्याच कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला होता. आता तर दोघांनी लग्नाआधीच पाडवा सेलिब्रेट केल्याचं त्यांच्या पोस्टमधून दिसून येतंय.    

हे ही वाचा: अभिनेत्री कमल ठोके यांच्या निधनानंतर ‘अज्या’ ची भावनिक पोस्ट,  ''जिजे अजून खूप त्रास द्यायचा होता गं तुला..''  

सिद्धार्थ आणि मिताली या दोघांनी लग्नाआधीचा पाडवा साजरा केला असून पुढच्या वर्षी 'मिस्टर अँड मिसेस' होणार असल्याचं म्हणत सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत. आता अनलॉकदरम्यान हळूहळू एक-एक गोष्टी सुरु होत असताना येणा-या नवीन वर्षात हे 'क्यूट कपल' विवाहबंधनात अडकणार आहे. खर तर २०१९ मध्येच या दोघांचं लग्न होणार होतं मात्र कोरोनाच्या संकटामुळे त्यांना लग्न पुढे ढकलावं लागलं. मितालीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलंय, ''मिस्टर एँड मिसेस नेक्स्ट इयर.''

२०१८ मध्ये 'व्हॅलेंटाइन डे'ला पहिल्यांदा सिद्धार्थनं इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर काही महिने डेट केल्यानंतर सिद्धार्थनं मितालीला लग्नासाठी प्रपोज केलं होतं. सिद्धार्थनं त्यावेळी देखील मितालीसोबतचा फोटो शेअर करत तिला प्रपोज केलंय आणि तिनं होकारही दिला असं म्हणत आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीची नव्याने चाहत्यांना ओळख करून दिली होती. 

‘उर्फी’ सिनेमातून मितालीने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीनं काम केलं आहे. तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने ‘गुलाबजाम’, ‘क्लासमेट’ सारखे अनेक सिनेमे केले आहेत. ‘अग्नीहोत्र’, ‘प्रेम हे’ यांसारख्या मालिकांमधूनही सिद्धार्थनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. दोघांच्या फोटोंना चाहत्यांकडून खूप पसंती मिळते.   

mitali mayekar and siddharth chandekar soon to get married celebrates diwali padwa