'इस्लाममध्ये संगीत हराम आहे'; 'मिया भाई' फेम रॅपरने सोडली म्युझिक इंडस्ट्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ruhaan arshad

'मिया भाई' फेम रॅपरने सोडली म्युझिक इंडस्ट्री, म्हणाला इस्लाममध्ये..

'मिया भाई' रॅपमधून फेम मिळवलेला हैदराबादी रॅपर रुहान अर्शद (Ruhaan Arshad) याने म्युझिक इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 2018 मध्ये 'मिया भाई' या रॅप गाण्याने त्याला तुफान प्रसिध्दी मिळाली. रॅपर रुहान अर्शद यांने त्याचे संगीत क्षेत्र सोडण्याच्या निर्णयाबद्दल मोठा खुलासा केला आहेत.

संगीत क्षेत्र सोडण्यामागचे कारण सांगताना रुहान अर्शद म्हणाला की, इस्लाममध्ये संगीत हे हराम आहे आणि तो आता फक्त हलाल करणार आहे हराम नाही. त्याच्या 'रुहान अर्शद ऑफिशियल' या यूट्यूब चॅनलवर त्याने संगीत जग सोडण्याची घोषणा केली. त्याच्या या चॅनेलवर तब्बल 2.34 मिलीयन (सुमारे 23 लाख) सबस्क्राइबर्स आहेत.

त्याने पोस्ट केलेल्या सात मिनिटांच्या व्हिडिओमध्ये अर्शद म्हणाला की, मला माझ्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे आणि तो जाहीर करताना माझ्या मनात दुसरा कोणताही विचार नव्हता. मी म्युझिक इंडस्ट्री पूर्णपणे सोडत आहे आणि यापुढे मी कधीही म्युझिक व्हिडिओ बनवणार नाही. इस्लाममध्ये संगीत हे पाप आहे हे मला माहीत आहे, पण ती माझी आवड होती, त्यामुळेच मी इकडे आलो, असे तो म्हणाला.

हेही वाचा: कंगना काय चुकीचं बोलली, माझ्याकडे पुरावे : विक्रम गोखले

पुढे तो म्हणाला की मी फक्त संगीत उद्योग सोडत आहे, यूट्यूब नाही. संगीत क्षेत्रातील त्याच्या प्रवासात दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांने चाहत्यांचे आभार मानले आणि पुढे कोणत्या प्रकारच्या कंटेंटवर काम करावे याबद्दल सल्ला मागितल्या. एवढेच नाही तर अर्शदने संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या त्याच्या फॉलोअर्सना देखील असे करण्याचे आवाहन केले. या इंडस्ट्रीत आलेल्यांनी संगीत क्षेत्र सोडावे, असे अर्शद म्हणाला. तो म्हाणाला की, आता जगात कुठलीही गोष्ट केली तर ती हलाल करू, हराम नाही.

रॅपर अर्शद 'मिया भाई' या रॅप गाण्याने युट्यूबवर रातोरात स्टार बनला. आतापर्यंत या व्हिडिओला 500 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र, अर्शदने म्युझिक इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय जाहीर करताच त्याच्या चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींनी त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले तर काहींनी या निर्णयावर टीका देखील केली आहे.

हेही वाचा: गुगलने बॅन केले 'हे' 7 Android अ‍ॅप्स; फोनमधून लगेच करा डिलीट

loading image
go to top