कोण आहेत आमदार धीरज देशमुख यांच्या पत्नी…

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

धीरज यांनी बाॅलिवूडमधीलमधील अभिनेते जॅकी भगनानी यांच्या बहिणीशी विवाह केला आहे. त्यांच्या पत्नीचे नाव दिपशिखा उर्फ हानी असे आहे, दिपशिखा ह्या चित्रपट निर्मात्या असून त्यांना एक मुलगा देखील आहे. 

मुंबई : माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते विलासराव देशमुख यांना तीन मुले आहेत. अमित, रितेश, धीरज यापैकी दाेघेजण राजकारणात सक्रीय आहेत. अमित व धीरज हे दाेघेही सध्या आमदार आहेत. धीरज देशमुख हे नाव सध्या चांगलेच चर्चेत आहे. धीरज यांनी बाॅलिवूडमधील अभिनेते जॅकी भगनानी यांच्या बहिणीशी विवाह केला आहे. ​

विलासराव देशमुख हे नाव म्हंटलं की महाराष्ट्राचा एक उत्तम माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो. एक संयमी आणि धडाडीचे नेतृत्व अशी ओळख त्यांनी राजकीय क्षेत्रात निर्माण केली होती.

दरम्यान, देशातील केंद्रीय मंत्रीमंडळातही त्यांनी मंत्री पदाचा कारभार सांभाळलेला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दुर्दैवाने निधन झालं. काँग्रेस पक्षातील आघाडीचा नेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राला आणि देशमुख कुटुंबाला एक धक्काच बसला, त्यांना तीन मुले आहेत. त्यापैकी सर्वात लहान चिरंजीव म्हणजे धीरज देशमुख 2019 ची विधानसभा निवडणूकीतून लातूर ग्रामीणमधून निवडून आले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Many happy returns of the day Vahini , wishing you loads of happiness on this day and forever. @geneliad #HappyBirthday

A post shared by Dhiraj Vilasrao Deshmukh (@dhirajvilasraodeshmukh) on

धीरज देशमुख यांचा जन्म 6 एप्रिल 1982 रोजी लातूरमध्ये झाला. आज त्यांचे वय 37 वर्षे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव विलासराव देशमुख आणि त्यांच्या आईचे नाव वैशाली देशमुख त्यांना दोन मोठे भाऊ देखील आहेत. सर्वात मोठा भाऊ अमित देखमुख हे सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत. तर दुसरा भाऊ रितेश देशमुख हे बाॅलिवूडमधील एक सुपरस्टार अभिनेते आहेत.

त्यांच्या दोन्ही भावांची लग्ने झाली आहेत, रितेश देशमुख यांनी अभिनेत्री जेनीलिया बरोबर लग्न केले आहे. धीरज देशमुख यांचा देखील विवाह झाला आहे, धीरज यांनी बाॅलिवूडमधीलमधील अभिनेते जॅकी भगनानी यांच्या बहिणीशी विवाह केला आहे. त्यांच्या पत्नीचे नाव दिपशिखा उर्फ हानी असे आहे, दिपशिखा ह्या चित्रपट निर्मात्या असून त्यांना एक मुलगा देखील आहे. 

त्यांचे वंश धीरज देशमुख असे आहे, धीरज देशमुख यांचे शालेय शिक्षण हे लातूरमध्ये पूर्ण झाले आहे. पुढे उच्चशिक्षण घेण्यासाठी ते परदेशात गेले, त्यांनी लंडनमधून “एम बी ए” पूर्ण केले. त्यांना क्रिकेट हा खेळ खूपच आवडतो, या खेळा विषयीच्या लहानपणीच्या अनेक गंमतीशीर आठवणी ते आपल्या भाषणात सांगत असतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Taking blessings from Aai TuljaBhavani at Tuljapur #blessings #family

A post shared by Dhiraj Vilasrao Deshmukh (@dhirajvilasraodeshmukh) on

लंडन हून एमबीए केल्यानंतर ते परत घरी ही परतले, परत आल्यानंतर राजकीय क्षेत्रात लक्ष घालण्यास त्यांनी सुरवात केली. 2014 ला लातूरचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली, युवक काँग्रेस अध्यक्ष पासून त्यांची कारकीर्द सुरू झाली. 2014 ला लोकसभा निवडणुकीत प्रचाराला त्यांचा सहभाग होता, धीरज देशमुख यांनी पहिली निवडणूक जिल्हा परिषदेची लढवली त्यांनी ही निवडणूक लातूरमधील एकुरका गटातून लढवली आणि ते विजयी देखील झाले. सध्या ते लातूर ग्रामीणमधून निवडून येऊन आमदार झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA dhiraj deshmukh wife information