esakal | बिग बींच्या बंगल्याबाहेर मनसेची पोस्टरबाजी; 'महानायक आपला मोठेपणा दाखवा'
sakal

बोलून बातमी शोधा

big b

बिग बींच्या बंगल्याबाहेर मनसेची पोस्टरबाजी; 'महानायक आपला मोठेपणा दाखवा'

sakal_logo
By
स्वाती वेमूल

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन Amitabh Bachchan यांच्या 'प्रतिक्षा' Prateeksha Bunglow बंगल्याबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोस्टरबाजी केली आहे. जुहू परिसरातील बिग बींच्या 'प्रतिक्षा' बंगल्याचा काही भाग हा रस्ते रुंदीकरणासाठी वापरला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसेचे MNS विभागीय अध्यक्ष मनिष धुरी यांनी बंगल्याबाहेर पोस्टरबाजी केली आहे. 'मोठे महानायक आपला मोठेपणा दाखवा हीच प्रतिक्षा', असं त्या पोस्टरवर लिहिले आहे. अमिताभ बच्चन यांनी संत ज्ञानेश्वर मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि जनतेला सहकार्य करावं, असंही त्यात लिहिलंय. (mns poster in front of amitabh bachchans prateeksha bunglow slv92)

जुहूमधील संत ज्ञानेश्वर मार्गावर बिग बींचा 'प्रतिक्षा' हा बंगला आहे. २०१७ मध्ये रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत बिग बी आणि त्या मार्गावरील इतर बंगले मालकांना त्यांच्या भूखंडाचा काही भाग देण्यासाठी पालिकेकडून नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटिशीला बहुतांश मालकांनी प्रतिसाद दिला. २०१९ मध्ये 'प्रतिक्षा' बंगल्याला लागूनच असलेल्या इमारतीची भिंत पाडण्यात आली. पण अमिताभ यांच्या बंगल्याला हात लावला नव्हता. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महापालिका रस्ता रुंदीकरण करत आहे. त्यासाठी या भागातील काही बंगल्यांचा भाग महापालिकेने ताब्यात घेतला आहे.

हेही वाचा: दिलीप कुमार यांच्या ऑटोग्राफसाठी 'बिग बी' अर्धा तास थांबले....

या भागातील काँग्रेस नगरसेवक ट्युलिप मिरांडा यांनी के-पश्चिम वॉर्डकडे हा मुद्दा उपस्थित केला होता. महापालिका जाणीवपूर्वक बच्चन यांची मालमत्ता ताब्यात घ्यायला विलंब लावतेय, असा आरोप त्यांनी केला होता. "लागून असलेल्या अन्य मालमत्ता ताब्यात घेतल्या आणि फक्त हा भूखंड सोडला आहे. शहर सर्वेक्षण अधिकाऱ्यांकडे हा विषय पाठवून महापालिका वेळकाढूपणा करतेय. महापालिकेने हा भूखंड ताब्यात घेतला नाही, तर आम्ही लोकायुक्तांकडे तक्रार करु" असे मिरांडा यांनी म्हटले होते.

loading image