हाय हिल सँडल घालणं पडलं महागात,सनी पडली पाण्यात

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 18 February 2021

आपल्या व्हिडिओ विषयी सनीनं लिहिलं आहे की, कुणी काही घाबरण्याचे कारण नाही. मी सुखरुप आहे.

मुंबई - सनी लिओनी सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री आहे. आपल्या चाहत्यांना कधीही नाराज न करणारी सेलिब्रेटी म्हणूनही सनीची ओळख आहे. चाहत्यांशी संवाद साधत राहणे, त्यांच्य़ा प्रश्नांना उत्तरे सनी देत असते. आता सनीचा एक वेगळा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली  आहे. त्याचे कारण ऐकल्यावर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

सनी चक्क स्विमिंग पूलमध्ये पडल्याचे त्या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे तिच्या चाहत्यांना काही काळजी करण्याचे कारण नाही. ती आता सुखरुप आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं सनी पडल्याची बातमी वा-यासारखी सगळीकडे पसरली. मात्र सनी त्या स्विमिंग पूलमध्ये पडली आहे हे पाहिल्यावर तिला बाहेर काढणे राहिले लांब फोटो काढण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. असे तिथे त्यावेळी उपस्थित लोकांनी सांगितले. सनीनं तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

आपल्या व्हिडिओ विषयी सनीनं लिहिलं आहे की, कुणी काही घाबरण्याचे कारण नाही. मी सुखरुप आहे. तो केवळ गंमतीसाठी तयार केलेला व्हिडिओ होता. स्वीमिंग पूलमध्ये पडण्याचा तिचा काही स्टंट नव्हता तर तिनं जाणीवपूर्वक ते केलं होतं. या व्हिडिओमध्ये सनी एका रेड कलरच्या ड्रेसमध्ये दिसते. तिनं यलो कलरचे मोठे सँडल घातले आहेत. गॉगल्सही लावले आहेत. तेव्हा ती पुलमध्ये पडतानाचे व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

त्या व्हिडिओला सनीनं कॅप्शनही दिलं आहे. ती म्हणते, संतुलन हे खूप आवश्यक गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही खाली पडणार असता तेव्हा त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. असे ती सांगते. ज्यावेळी सनीनं हा व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा त्याच्या दोन तासानंतर तिला साडेपाच लाख लाईक्स मिळाले होते. तसेच तिच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात तिचे कौतूक केल्याचे दिसुन आले आहे. यापूर्वी सनीनं एक पोस्ट व्हायरल केली होती त्यात तिनं असं लिहिलं होतं की, मला भीती वाटते की लोकं माझ नाव आता विसरुन जातील. त्यामुळे मी काही आयडिया शोधल्या आहेत. असे तिचे म्हणणे आहे.  

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: model actress sunny Leone falls in swimming pool wearing high heels video goes viral