esakal | 'मिलिंदला झाले तरी काय, नाक टोचून काजळ लावले'
sakal

बोलून बातमी शोधा

milind soman new looks photo

नाक टोचलेलं आणि काजळ, गालावर कुंकू अशा रुपातील फोटो मिलिंदने शेयर केला आहे. चार तासांपूर्वी पोस्ट केलेल्या फोटोला आतापर्यत 24 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

'मिलिंदला झाले तरी काय, नाक टोचून काजळ लावले'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - देशातला सुपर मॉडेल म्हणून परिचित असणारा मिलिंद सोमण हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या एका बोल्ड फोटोसाठी चर्चेत आला आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर शेयर केलेल्या फोटोवरुन त्याला नेटक-यांकडून टीकेला सामोरं जावं लागल्याचे दिसून आले आहे. मात्र एवढे करुनही तो मिलिंद शांत बसला नाही त्याने आपला आणखी एक फोटो शेयर केला आहे. तो फोटोही चांगलाच व्हायरल होतो आहे.

नाक टोचलेलं आणि काजळ, गालावर कुंकू अशा रुपातील फोटो मिलिंदने शेयर केला आहे. चार तासांपूर्वी पोस्ट केलेल्या फोटोला आतापर्यत 24 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. मोठ्या प्रमाणात कमेंटही मिळाल्या आहेत. त्यातील काहींनी मिलिंदचे कौतूक केले आहे तर काहींनी त्याच्या या नव्या लुकला नाके मुरडली आहेत. गोव्यातील समुद्रकिनारी मिलिंदला बोल्ड फोटोशुट करणे चांगलेच महागात पडले होते. त्याला सपोर्टसाठी त्याची पत्नी अंकिता समोर आली होती. तिने त्याचा एक शर्टलेस फोटो नुकताच शेयर केला आहे.

सध्या मिलिंदवर त्याने त्य़ाच्या जन्मदिनाच्या दिवशी बोल्ड फोटोशुट करुन ते सोशल मीडियावर व्हायरल केले होते. यामुळे तो चर्चेत आला होता. त्याच्यावर वास्को पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिलिंदच्या अशाप्रकारच्या लुकने त्याच्या नव्या भूमिकेवर प्रश्न उभे केले आहेत. त्याला अशा प्रकारे फोटो शुट करुन त्याला नेमकं काय सांगायचे आहे असेही असा प्रश्न त्याला काहींनी विचारला आहे. मला माहितीये की आता होळीचा सण नाही. गेल्या काही दिवसांपासून मुंबईजवळ असलेल्या कर्जतमध्ये काही मजेशीर गोष्टी केल्या आहेत.  त्याबद्दल सांगेनच.  मिलिंदच्या आगामी प्रोजेक्टसाठीचं हे फोटोशूट असून त्याविषयीची माहिती तो लवकरच देणार आहे.

वास्को पोलीस ठाण्यात मिलिंदवर गुन्हा दाखल होणे त्यानंतर त्याच्या पत्नीने फोटो शेयर करणे यावरुन ते दोघेही नेटक-यांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. या फोटोविषयी लिहिताना अंकिता म्हणते, मला मिलिंदचा गर्व वाटतो. माझ्या व्हिटॅमिन ची तो डी गोळी आहे.