#PlasticBan पुनम पांडेला पडला 'हा' प्रश्नं 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

पहिलं ट्विट म्हणजे 'प्लास्टिक सर्जरी ज्यांनी ज्यांनी केली आहे त्यांनी रस्त्यावर फिरु नये.' या ट्विटला लोकांनी दुर्लक्षित केलं पण दुसरं ट्विट पुनमनं चक्कं कंडोम बाबत केलं.

मॉडेल पुनम पांडे अति बोल्ड आणि अति बोलण्यानेच चर्चेत असते. पुन्हा एकदा असंच चर्चेत येण्याचं कारण म्हणजे सरकारने केलेल्या प्लास्टिकबंदीवर पुनमने उपहासात्मक आणि वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 

क्रिकेट सामना जिंकल्यानंतर न्यूड होणार असल्याचं म्हणत पुनमनं खुप प्रसिद्धी मिळवली होती. आता तिनं ट्विट करत पुन्हा लोकांचं लक्षं वेधलं आहे. पण सोशल मिडीयावर तिच्या या ट्विटमुळे तिला भरपूर ट्रोल व्हावं लागलं आहे. प्लास्टिक बंदीबाबत दोन ट्विट पुनमनं केले आहेत. पहिलं ट्विट म्हणजे 'प्लास्टिक सर्जरी ज्यांनी ज्यांनी केली आहे त्यांनी रस्त्यावर फिरु नये.' या ट्विटला लोकांनी दुर्लक्षित केलं पण दुसरं ट्विट पुनमनं चक्कं कंडोम बाबत केलं. 'प्लास्टिक बंदी झाल्यामुळे आता कंडोमवर देखील बंदी घालण्यात आली आहे का?' असा प्रश्न पुनमनं विचारला. 
 

या ट्विटनंतर लोकांनी तिला रबर आणि प्लास्टिक यामधील फरक तुला कळत नसेल तर शाळेत जाऊन शिक, असा सल्ला देत टिका केली. पुनम तिच्या अशाच प्रकारच्या वादग्रस्त विधानाने लोकांचे लक्षं आपल्याकडे वेधून घेत असते.  
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Model Poonam Pandey Tweeted About Plastic Ban