Mohammed Rafi: आपल्या आवाजाने जगाला वेड लावणाऱ्या मोहम्मद रफींना गाण्याचे वेड कसे लागले माहितीय?

जादुई आवाजाच्या मोहम्मद रफी यांचा आज वाढदिवस, त्या निमित्ताने जाणून घेऊया ही खास बात..
Mohammed Rafi Birthday: A Fakir inspired Mohammed Rafi to become a singer
Mohammed Rafi Birthday: A Fakir inspired Mohammed Rafi to become a singersakal

Mohammad Rafi Birthday: मैने पुछा चांद से.. किंवा मराठीत शोधसी मानवा.. ही गाणी ऐकली की आपल्या समोर एकच व्यक्ती येते ती म्हणजे 'मोहम्मद रफी'... प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके असलेले मोहम्मद रफी साहब यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या आवाजाने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अशा मोहम्मद रफी यांची आज ९८वी जयंती. या खास प्रसंगी त्यांचे स्मरण करून, त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया.

(Mohammed Rafi Birthday: A Fakir inspired Mohammed Rafi to become a singer)

Mohammed Rafi Birthday: A Fakir inspired Mohammed Rafi to become a singer
Anil Kapoor Birthday: टपोरीगिरी, गॅरेजमध्ये काम ते थेट एव्हरग्रीन हीरो अनिल कपूर.. वाचा सविस्तर..

मोहम्मद रफी यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी अमृतसरजवळील कोटला सुलतान येथे झाला. त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. जेव्हा ते 7 वर्षांचे होते, तेव्हा ते गाण्याच्या प्रेमात पडले आणि तेव्हापासून त्यांनी गायला सुरू केले. लहानपणी ते मोठ्या भावाच्या दुकानात जात असत तेव्हा वाटेत त्यांना एक फकीर भेटत असे. तो फकीर गाणी म्हणत जायचा. रफी यांना त्याचा आवाज खूप आवडायचा. त्यामुळे ते रोज त्याच्या मागे लागायचे. मग एके दिवशी फकीरने रफीसाहेबांना गाण्यास सांगितले, तेव्हा त्यांचा आवाज ऐकून फकिराला खूप आनंद झाला. फकीरने त्याला मोठा गायक होशील असा आशीर्वाद दिला, आणि रफी यांचे नशीब पालटले.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Mohammed Rafi Birthday: A Fakir inspired Mohammed Rafi to become a singer
Rohit Shetty cirkus: रोहित शेट्टीच्या चित्रपटात का दिसतात मराठी कलाकार.. कारण ऐकून अभिमान वाटेल..

मोहम्मद रफी 20 वर्षांचे होते जेव्हा ते मुंबई शहरात आले. पहिल्यांदा पंजाबी चित्रपटात गाण्याची संधी त्यांना मिळाली. पण फारसी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यानंतर त्यांना नौशाद यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. 'तेरा तोयोना तुता' हे गाणे त्यांनी गायले. हे गाणे गाण्याआधीच नौशाद साहेबांनी भाकित केले होते की हे गाणे रिलीज होताच प्रसिद्ध होईल आणि रफीसाहेबांना नवी ओळख मिळेल. आणि तसेच झाले या गाण्यापासून मोहम्मद रफी यांना खरी ओळख आणि प्रसिद्धी मिळाली.

मोहम्मद रफी यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, ते अत्यंत निखळ मनाचे होते आणि त्यांच्यामध्ये खूप प्रेमळपणा होता. गाण्यासाठी किती पैसे मिळतील, असा प्रश्न त्यांनी संगीतकाराला कधीच विचारला नाही. त्यांचे काम फक्त येऊन गायचे... अनेक वेळा संगीतकार त्यांना फक्त १ रुपयात गाणे म्हणायला लावायचे. यातही रफीसाहेब खूप खुश राहिले. त्यांनी हिंदीबरोबरच इतर भाषांमध्येही गाणी गायली आहेत.

मोहम्मद रफी यांनी सर्व प्रकारची गाणी गायली असून 7000 हून अधिक गाण्यांना आवाज दिला आहे. इतकेच नव्हे तर 1967 मध्ये मोहम्मद रफी यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.आज जरी रफी साहब या जगात आपल्या सर्वांमध्ये नसले तरी त्यांच्या आवाजाची जादू आजही कायम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com