मोनालिसाने वाळूवर केला कॅट वॉक; काळ्या रंगाचा ड्रेसमध्ये पाहून चाहते घायाळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monalisa

मोनालिसाची किलर ब्यूटी; काळ्या ड्रेसमध्ये पाहून चाहते घायाळ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : भोजपुरी क्वीन व हिंदी मालिकांमध्ये काम करणारी मोनालिसा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करीत असते. मागे तिने छठ पूजेनिमित्त सुंदर फोटो शेअर केले होते. या फोटोंना पाहून तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले होते. आता तिने व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये मोनालिसा गोव्याच्या बीचवर दिसत आहे. ती लाइट्सच्या दरम्यान वाळूवर कॅट वॉक करीत आहे. कॅट वॉक करताना ती चांगले लूकही देत आहे. या व्हिडिओने इंटरनेटवर चांगले लाईक्स मिळत आहे. व्हिडिओमध्ये मोनालिसा किलर ब्युटीने चाहत्यांची मने जिंकत आहे. मोनालिसाने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. यात ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे. तिची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे.

हेही वाचा: वि. प. निवडणूक : महाविकास आघाडीविरुद्ध भाजपला उमेदवार मिळेना!

मोनालिसाचे इंस्टाग्राम अकाउंट बोल्ड फोटोंनी भरलेले आहे. ती अनेकदा वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो शेअर करीत असते. तिचे हे बोल्ड फोटो चाहत्यांना खूप आवडते. ‘मला आयुष्यात खूप ट्रोल व्हावे लागले आहे. बॉडी शेमिंगपासून नीट इंग्लिश बोलता न येण्यापर्यंत आणि कपड्यांपर्यंत लोकांनी माझी चेष्टा केली. परंतु, हळूहळू मला समजले की या ट्रोल्सकडे दुर्लक्ष करणे चांगले आहे. मी एकाच वेळी अस्खलित इंग्रजी कसे बोलू शकतो. ग्रूमिंगला थोडा वेळ लागतो.’ असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

व्हिडिओला प्रचंड लाइक आणि शेअर

मोनालिसाचे चाहते तिच्या व्हिडिओला प्रचंड लाइक आणि शेअर करीत आहेत. कॉमेंट बॉक्सवर फायर आणि हार्ट इमोजी शेअर करीत आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘तू खूप क्यूट आहेस’. दुसऱ्या चाहत्याने ‘तुम्ही कहर केला’ अशी कमेंट केली आहे. त्याचवेळी इतर वापरकर्ते मोनालिसाच्या सौंदर्याची प्रशंसा करीत आहेत.

loading image
go to top