Money Heist 5 Review; 'शेवटी प्रोफेसर जिंकले की हरले'?

मनी हाईस्टच्य़ा पाचव्या सीझनमधील शेवटचे पाच भाग नुकतेच प्रदर्शित झाले. त्याला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
Money Heist 5 Review; 'शेवटी प्रोफेसर जिंकले की हरले'?

मनी हाईस्टच्य़ा पाचव्या सीझनमधील शेवटचे पाच भाग नुकतेच प्रदर्शित झाले. त्याला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक या मालिकेच्या शेवटच्या भागाची वाट पाहत होते. त्यांना त्यांच्या लाडक्या प्रोफेसरचा मास्टर प्लॅन यशस्वी होतो किंवा नाही हे पाहण्याची उत्सुकता होती. अखेर त्या मालिकेचा शेवटच्या सीझन प्रदर्शित झाला. त्यातील उर्वरीत पाच भागांमध्ये प्रोफेसर आणि त्याच्या भावाचं स्वप्न होतं त्याचा थरारक प्रवास मांडण्यात आला आहे. प्रोफेसर कमालीचा हुशार आहे, कल्पक आहे, संयमी आहे, कुठलाही निर्णय घेताना तो विचारपूर्वक घेतो. मात्र या शेवटच्या भागामध्ये प्रोफेसरचा मूड काहीसा बदलेला दिसून येतो.

आतापर्यत मनी हाईस्टच्याय पूर्वीच्या भागात प्रोफेसर कुणावर चिडला आहे हे फारसं दिसलं नाही. मात्र शेवट्या सीझनमध्ये त्यातल्या त्यात जे पाच एपिसोड काल प्रदर्शित झाले त्यात तो कमालीचा तापट झालेला दाखवला आहे. प्रोफेसरला काहीही अशक्य नाही. प्रत्येक गोष्टीचा त्याच्याकडे प्लॅन बी रेडी असतो हे एव्हाना या मालिकेच्या चाहत्यांना माहिती झाले आहे. त्यामुळे त्याची ही शेवटची चोरी यशस्वी होणार की नाही याबद्दलही त्यांच्या मनात खात्री आहे. मात्र आपण जे पाहतो त्यापेक्षा वेगळं धक्कादायक कथानक दिग्दर्शकानं आपल्यासमोर मांडलं आहे. त्यामुळे प्रेक्षक शेवटपर्यत मनी हाईस्टपासून लांब जात नाही. स्पेनच्या बँकेतून 90 टन सोनं वितळून ते बाहेर काढण्याचं प्लॅनिंग प्रोफेसर आणि त्याचा भाऊ बर्लिन यांनी केलं खरं. त्यात येणाऱ्या सर्व अडचणींना तोंड देण्याची तयारीही त्यांनी केली आहे. पण यावेळी त्यांच्या वाट्याला येणाऱा संघर्ष कमालीचा जीवघेणा आहे.

टोकियो, नैरोबी, बर्लिन यांचा मृत्यु झाला आहे. आपले जीवलग गमावल्यानंतरही मिशन सुरु ठेवून काहीही झालं तरी सोनं बाहेर न्यायचचं असा निर्धार प्रोफेसर आणि त्याच्या टीमनं केला आहे. सतत येणार अपयश, पोलिसांचा पाठीमागे लागलेला ससेमिरा यामुळे त्याच्या टीममध्ये अपयशाची भावना वाढीस लागली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या आपआपसांतील संबंधावर झाला आहे. कुरबुरी वाढल्या आहेत. प्रोफेसरलाच पोलिसांनी अटक केली म्हटल्यावर तर त्यांची पाचावर धारण बसते. बँकेत असणाऱ्या त्या सर्व टीमला पोलिसांसहीत आर्मीचाही वेढा पडल्यानं आता आपण थोड्याच वेळाचे सोबती आहोत. हे जाणवू लागते. त्यापैकी रकेलला काहीही झालं तरी प्रोफेसरकडे प्लॅन बी रेडी असेल असं वाटत असतं. पण यावेळी प्रोफेसरनं केलेलं प्लॅनिंग आपल्याला थक्क करुन जातं. वेगवेगळ्य़ा शक्यता, तार्किकता, वेग, यांचा सुंदर मिलाफ दिग्दर्शकानं मनी हाईस्टमध्ये केला आहे.

प्रेक्षकांना सतत प्रश्न पडतो तो असा की, प्रोफेसर आपल्या टीमला वाचवण्यात यशस्वी होणार की नाही? हे सारखं त्यांना वाटण्याचे कारण म्हणजे पोलीस अधिकारी अलिसा सियारानं प्रोफेसर पुन्हा एकदा अडकवलं आहे. त्याला एका ठिकाणी बांधून ठेवलं आहे. मनी हाईस्टच्या पाचव्या सीझनमधील शेवटच्या भागातील थरार चक्रावून टाकणारा आहे. तमायोनं आक्रमक रुप धारण करुन सगळ्यांना अटक केली आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की सगळं संपलं. काही करुन प्रोफेसरला जेरीस आणण्यासाठी आटापिटा करणाऱ्या तमायोनं प्रोफेसरलाही अटक केली आहे. त्यावेळी तर मनी हाईस्टचा पुढच्या सीझनमध्ये त्याचं उत्तर मिळणार की काय असं वाटायला लागतं.

आपण जसजसा विचार करत जातो तसतसं मनी हाईस्ट वेगळ्या प्रकारे आपल्या समोर येऊ लागतं. प्रोफेसरचा प्लॅन बी तयार होता. त्यानं जी कमाल केली आहे ती पाहण्यासाठी मनी हाईस्टच्या शेवटच्या पाच भागांमधील थरार अनुभवावा लागेल. नेहमीप्रमाणे उत्कंठावर्धक, रहस्यमय, वेगवान कथानकाची सफर आपल्याला दिग्दर्शकानं या मालिकेतून घडवून आणली आहे. केवळ प्रोफेसर सर्जिओच नाही तर इतर सगळीच पात्र आपलं लक्ष वेधून घेतात. काहीही झालं तरी प्रोफेसर आपल्या सगळ्यांना एकटं सोडणार नाही. ते आपल्याला या संकटातून बाहेर काढतील असा विश्वास त्या सहकाऱ्यांच्या मनात शेवटपर्यत टिकून राहतो की त्याला तडा जातो हे जाणून घेण्यासाठी सध्याच्या घडीला मनी हाईस्ट बेस्ट ऑप्शन आहे.

* रेटिंग - ****

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com