esakal | Money Heist 5: टोकियोच्या मृत्यूनंतर चाहते भावूक; ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

tokyo

Money Heist 5: टोकियोच्या मृत्यूनंतर चाहते भावूक; ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस

sakal_logo
By
स्वाती वेमूल

बहुचर्चित व बहुप्रतिक्षित वेब सीरिज 'मनी हाइस्ट'चा Money Heist 5 पाचवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा पाचवा सिझन दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून पहिल्या भागातील पाच एपिसोड ३ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाँच झाले. पहिल्या आणि दुसऱ्या सिझनमध्ये प्रोफेसर आणि त्याच्या गँगने रॉयल मिंट ऑफ स्पेनवर दरोडा टाकला होता. तर तिसऱ्या आणि चौथ्या सिझनमध्ये बँक ऑफ स्पेनमध्ये सर्व सोनं वितळवून नेण्यासाठी गँगची धडपड सुरू असते. पाचव्या सिझनमध्ये अनेक रंजक ट्विस्ट असून त्याचा शेवट टोकियाच्या Tokyo मृत्यूने झाल्याचं पहायला मिळतं.

टोकियोच्या मृत्यूने चाहते निराश झाले असून सोशल मीडियावर त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. 'टोकियो स्वार्थी आणि बेपर्वा होती. पण या सिझनमध्ये तिची एक वेगळीच बाजू पहायला मिळाली. मनी हाइस्टचा प्रत्येक सिझन प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतो', असं ट्विट एकाने केलं. तर दुसऱ्याने टोकियोच्या जीवनावर एका मिनी सीरिजची मागणी केली. पाचव्या सिझनच्या कथेवर अनेक मीम्ससुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा: 'मनी हाईस्ट' आवडला? मग, हे चित्रपट आणि शो एकदा पाहाच!

या सिझनचे नंतरचे पाच एपिसोड्स हे तीन महिन्यांनंतर ३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहेत. 'मनी हाइस्ट ५'चा ट्रेलर प्रदर्शित होताच जगभरातील चाहत्यांनी, प्रेक्षकांनी त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडला. आगळ्यावेगळ्या विषयावरील मांडणी असणा-या मनी हाईस्टनं जगभरातील प्रेक्षकांना वेड लावलं होतं. यातील प्रोफेसरची भूमिका करणारा अल्वारो मोर्ते (alvaro morte) हा प्रचंड लोकप्रिय झाला. केवळ परदेशातच नाही तर भारतातही या वेब सीरिजचे अनेक चाहते आहेत. या मालिकेच्या चौथ्या सिझनलाही मोठी प्रसिद्धी मिळाली होती.

loading image
go to top