ज्युनिअर एनटीआरच्या 'NTR 30' या चित्रपटाचं मोशन पोस्टर पाहून डोळे फिरतील.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NTR 30 movie teaser release

ज्युनिअर एनटीआरच्या 'NTR 30' या चित्रपटाचं मोशन पोस्टर पाहून डोळे फिरतील

Jr NTR New Movie ' : अभिनेता ज्युनियर एनटीआर चा (Junior NTR) आज त्याचा 39वा वाढदिवस. या निमित्ताने चाहते त्याला भरभरून शुभेच्छा ते असतानाच त्यानेही चाहत्यांना एक भेट दिली आहे. ही भेट पाहून अनेकांचे डोळे फिरले आहेत. कारण आरआरआर (RRR MOVIE) या चित्रपटाने घातलेली भुरळ अजूनही प्रेक्षकांच्या मनावर ताजी असतानाच त्याने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. (jr NTR new movie)

हेही वाचा: PHOTO: 'ज्युनिअर एनटीआर'ची राजकीय पार्श्वभूमी माहित आहे का? पाहून झोप उडेल

त्याच्या वाढदिवसाचे खास औचित्य साधून ही घोषणा करण्यात आली. प्रेक्षकांसाठी त्यानं दिलेल हे एक खास गिफ्ट म्हणावं लागेल. चित्रपटाचे नाव 'एनटीआर ३०' ( NTR 30 ) असे असून चित्रपटाचे मोशन पोस्टरही (टिझर) निर्मात्यांनी रिलीज केले आहे. 'ज्युनिअर एनटीआर'ने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून ते शेअर केले आहे. (NTR 30 motion poster released ) (NTR 30 TEASER released)

एनटीआरचा हा चित्रपट जबरदस्त अॅक्शन थ्रिलरने परिपूर्ण असणार याची प्रचिती या पोस्टर वरून कळते. त्यामुळे हा चित्रपट कधी येणार याबाबत आता चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. चाहत्यांनी एनटीआरच्या या पोस्ट वर अक्षरशः प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोरताला शिवा (kortala siva) करणार आहेत. अभिनेता एनटीआर आणि कोरताला शिवा दुसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत आहे. यापूर्वी 2016 मध्ये 'जनता गॅरेज' (janata garage) या चित्रपटाचे दिग्दर्शनही शिवा यांनी केले होते. या चित्रपटची निर्मिती सुधाकर मिक्किलीनेनी (mikkilineni) आणि हरी कृष्णक (hari krushak) करतील, तर नंदामुरी कल्याण राम (nandamuri kalyan ram) प्रस्तुत करणार आहेत. हा चित्रपट बिग बजेट असून अनेक दिग्गज कलाकार यात असतील अशी चर्चा आहे.

Web Title: Motion Poster From Ntr 30 Released Ahead Of Jr Ntrs Birthday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top