Moushumi chatterjee: १४ व्या वर्षी हिरोईन अन् १८ व्या वर्षी आई.. अभिनेत्री मौसमी चॅटर्जीच्या काही खास गोष्टी..

बॉलीवुड अभिनेत्री मौसमी चॅटर्जीचा आज वाढदिवस त्या निमित्ताने जाणून घेऊया खास बात..
Moushumi chatterjee birthday news career love story early marriage life style
Moushumi chatterjee birthday news career love story early marriage life stylesakal

Moushumi chatterjee: बॉलीवुडला आपल्या सौंदर्याची भुरळ घालणारी अभिनेत्री म्हणजे मौसमी चॅटर्जी. अत्यंत कमी वयात बरंच मोठं यश मिळवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे मौसमी. अनेक दिग्गजांसोबत काम करणाऱ्या मौसमी यांचे करियर जितक्या लवकर सुरू झाले तितक्या लवकर थांबलेही.. आज त्यांचा वाढदिवस. त्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी.

मौसमी यांचा जन्म २६ एप्रिल १९४८ रोजी झाला. त्या मूळच्या बंगालमधल्या. बॉलीवूडमध्ये जारी त्याक मौसमी चॅटर्जी या नावाने ओळखल्या जात असल्या तरी त्यांचे खरे नाव अनेकांना ठाऊक नाही. मौसमी यांचे खरे नाव 'इंदिरा' असून दिग्दर्शक तरूण मजूमदार यांनी त्यांचे नाव 'मौसमी' ठेवले.

मौसमी यांचे वडिल भारतीय लष्करात होते आणि आजोबा न्यायाधीश होते. तरूण मजूमदार यांनी ‘बालिका वधू’ या चित्रपटाची आॅफर दिली त्यावेळी मौसमी यांचे वय केवळ १४ वर्षे होते. पण त्यांच्या वडिलांचा चित्रपटात काम करण्याला सक्त विरोध होता. शेवटी तरूण मजूमदार यांच्या पत्नीने मौसमींच्या घरच्यांची समजूत काढली आणि मौसमी यांनी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले.

त्यानंतर १९७२मध्ये रिलीज झालेल्या ‘अनुराग’ या सिनेमाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या चित्रपटात एका दृष्टिहिन मुलीची भूमिका त्यांनी साकारली होती. ही भूमिका मौसमीसाठी मोठे आव्हान होते. पण मौसमी यांनी ते स्वीकारले आणि पुढे या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट केले पण यशाच्या शिखरावर असताना मौसमी लग्नाचा निर्णय घेतील, असे कुणालाही वाटले नव्हते. पण मौसमी प्रसिद्ध गायक हेमंत कुमार यांचा मुलगा जयंतबरोबर लग्न केले आणि अवघ्या वयाच्या १८ व्या वर्षी पहिल्या अपत्याला जन्मही दिला.

लग्नानंतर अभिनेत्रींचे करिअर संपुष्टात येते, या मान्यतेला मौसमी यांनी छेद दिला. लग्नानंतर काही वर्षांचा ब्रेक घेतला. पण तयानंतर त्यांनी पुन्हा एकदा धमाकेदार वापसी केली. आवाज, घायल, ना तुम जानो ना हम, आ अब लौट चले या चित्रपटांनी मौसमी यांना मोठे यश मिळवून दिले.

मौसमी आणि विनोद मेहरा यांच्या जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंत केले. याशिवाय जितेंद्र, संजीव कुमार, राजेश खन्ना, शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतही मौसमी यांनी काम केले. कच्चे धागे, जहरीला इंसान, स्वर्ग नरक, फूलखिले हैं गुलशन गुलशन, मांग भरो सजना, दासी,अंगूर, घर एक मंदिर अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटात मौसमी चॅटर्जी प्रमुख भूमिकेत होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com