Movie Review: समुद्राची गाज, दीपिकाचा रोमान्स 'गहराईयात' दुसरं नाही काही...

दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीच्या गहराईयाची सध्या चर्चा आहे.
Gheraiyaan Movie Review
Gheraiyaan Movie Review

Movie Review: दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीच्या गहराईयाची सध्या चर्चा आहे. (Bollywood Trailer) ट्रेलरला तर नेटकऱ्यांचा तुफान प्रतिसादही मिळाला होता. (Bollywood News) त्यावरुनच प्रेक्षकांनी अंदाज बांधला होता की यामध्ये दीपिकाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळणार आहे. त्यानंतर तिच्या बोल्डनेसच्या बातम्याही व्हायरल झाल्या होत्या. नातं, त्या नात्यातील दुरावा, नवीन नातं ते निभावताना शारीरिक संबंधांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि अखेर त्यावरुन होणारे वाद म्हणजे गहराईया असे म्हणावे लागेल. हिंदी- इंग्रजी चटपटीत संवाद, खासकरुन इंग्रजी भाषेतील शिव्या, हे सध्या वेबसीरिज, चित्रपट यांचे समीकरण झाले आहे. ही भाषा आजच्या तरुणाईची आहे. असंही म्हटलं जातं. Movie Review Of Deepika Padukone Gheraiyaan

शांतीप्रियाला आता अलीशा व्हायचं आहे. त्यासाठी तिची धडपड सुरु आहे. मात्र त्यासाठी तिच्या वाटेत येणाऱ्या अडचणीही अनेक आहेत. त्याचा सामना करताना तिला धाप लागतेय. म्हणून ती आधार शोधतेय. तो आधार मानसिक आहे आणि शारीरिकही. हे सगळं पडद्यावर पाहताना आपणच बऱ्याचदा गोंधळून जातो. नेमकं काय चाललं आहे. कोणाला काय म्हणायचे आहे, दिग्दर्शक नेमकं काय सांगू पाहतो आहे, दरवेळी ऐकु येणारी समुद्राची गाज, त्याच्यासोबत येणारे वाद त्या पात्रांभोवतीचं गुढ वाढवत असतात. गहराईया पाहताना आपल्याला कळत नाही की अलिशा दीपिका आहे की दीपिका अलिशा... अशा गोंधळून टाकणाऱ्या गहराईयानं सध्या प्रेक्षकांना समुद्राच्या खोलात घेऊन गेला आहे. दोन जोडप्यांची प्रेमकहाणी जी एका वेगळ्या टप्प्यावर येऊन मिळते. त्याची साक्ष आहे तो समुद्र.

दिग्दर्शक शकुन बत्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या गहराईयाचा वेग कंटाळा आणणारा आहे. गेल्या दोन वर्षांपासून वेब सीरिज आणि क्राईम, थ्रिलर जॉनरच्या वेगवान कथानकाचे चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना गहराईचा वेग मानवणारा नाही. त्यामुळे तो सुरुवातीच्या 15 मिनिटांनंतर रटाळवाणा वाटायला लागतो. दिग्दर्शक शकुन बत्रा यांनी सांगितलं होतं की, गहराईयाचा विचार माझ्या मनात दहा वर्षांपूर्वी आला होता. मात्र 10 वर्षांमध्ये मनोरंजन विश्व कमालीचे बदलले आहे. प्रेक्षकांची आवड निवड बददली आहे. त्यांचा या माध्यमाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला आहे.

अलिशा ही तिच्या बहिणीच्या बॉयफ्रेंडवर लट्टु होते. त्याच्यावर तिचे मन जडते. मात्र आपल्या बहिणीला या गोष्टीची कधी ना कधी भणक लागेल. आणि त्याचा काय परिणाम होईल याची पर्वा अलिशाला नाही. शेवटी जे व्हायचं ते होतचं मात्र त्याची परिणीती वेगळी आहे. ती काय हे जाणून घ्यायची इच्छा असल्यास गहराईच्या वाट्याला जावं लागेल. सिद्धांत चतुर्वेदीच्या वाट्याला बंटी और बबली 2 नंतर मोठा प्रोजेक्ट वाट्य़ाला आला आहे. अनन्या पांडे अजून लाईमलाईटमध्ये येण्यासाठी धड़पडते आहे. संगीत, छायाचित्रण आणि संवाद हे ठीकठाक आहे. बाकी सगळा गोंधळ आहे. सतत वेगवेगळ्या ट्रॅकवर जाणारं कथानक, त्याची वळणं हे सगळं प्रेक्षकांच्या संयमाची परिक्षा पाहणारं आहे.

गहराईया का पाहायचा, ज्यांना बोल्डनेसमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी गहराईच्या वाट्याला जावं. दीपिकाच्या चाहत्यांसाठी ही आगळी वेगळी ट्रीट आहे. रुटीन लव स्टोरी सोडून हटके ट्राय करणाऱ्यांसाठी गहराईयाचा ऑप्शन हा काही वाईट नाही. वास्तविक गेल्या दोन वर्षांपासून दीपिकाच्या या चित्रपटाची तिच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता होती. मात्र तो फारसा प्रभावित करताना दिसत नाही. त्यानं प्रेक्षकांची निराशा केली आहे. पद्मावत नंतर दीपिकाला पुन्हा मोठ्या यशाची अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. तिच्या लोकप्रियतेचा आलेख कमी होताना दिसत आहे. तिचा छपाकही फ्लॉप झाला. त्यानंतर 83 लाही प्रेक्षकांनी नाकारले. आणि आता गहराईयामध्ये तर दीपिकाबद्दलची तिच्या चाहत्यांची नाराजी दिसून आली आहे.

* गहराईया -

दिग्दर्शक - शकुन बत्रा

रेटिंग - **

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com