'मला चांगलं म्हणा! सांगणारी मलायकाची 'पांचट' सीरिज|Moving With Malaika Review | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Moving With Malaika Review

Moving With Malaika Review: 'मला चांगलं म्हणा! सांगणारी मलायकाची 'पांचट' सीरिज

Moving In With Malaika Arora bollywood actress web serise review : माझा संघर्ष किती मोठा आहे. आज मी जे काही आहे त्यामागे मला कोणकोणत्या कठीण काळातून जावं लागलं. दरवेळी मला माझ्या पहिल्या लग्नाविषयी बोललं जातं, त्यावरुन प्रश्न विचारले जातात. लोकांना खरं काय ते माहिती नसतं ते बोलतात. मी ते मनावर घेत नाही. असं सांगत मलायकाची ती सीरिज सुरु होते.

ओटीटीवर मुव्हिंग इन विथ मलायका नावाची सीरिज प्रदर्शित झाली आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. मात्र ती सीरिज पाहिल्यावर त्याविषयी नेटकऱ्यांच्या फार चांगल्या प्रतिक्रिया आहेत असे नाही. निव्वळ आपण किती ग्रेट हे सांगण्याचा मलायकाचा तो प्रयत्न कमालीचा केवळवाणा वाटू लागतो. मणिरत्नम यांच्या दिल से चित्रपटात ट्रेनमध्ये बसून तिनं छैय्या छैय्या नावाच्या गाण्यावर डान्स केला होता. तो लोकप्रिय झाला होता. त्याची जर्नी मलायका सांगते. मात्र त्यातील तिचा तो नाटकीपणा काही लपून राहत नाही.

हेही वाचा - Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

बॉलीवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान मलायकाच्या घरी येते. येताना ती तिला स्वता तयार केलेली बिर्याणी घेऊन येते. ती खाताना त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा होते. यात प्रमुख मुद्दा गेल्या काही महिन्यांपूर्वी मलायकाला झालेला अपघआत. तिच्या डोळ्याला झालेली मुलाखत. फराह तिला बोलतं करते, मलायका रडू लागते...मला आता काहीच दिसणार नाही. मी नैराश्यात जाण्याची बाकी होते. आपलं आयुष्य किती छोटं आहे याविषयी सांगू लागते. पण हे किती उथळ आहे हे तिच्या बोलण्यावरुन लक्षात येते.

मलायकानं तिच्या या सीरीजच्या माध्यमातून आपण किती श्रेष्ठ आहोत आणि वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्ये आपण स्वताला कसे तयार केले हे सांगते. त्यावर प्रसिद्ध अभिनेत्री आणि तिच्या जीवा भावाच्या मैत्रीणी करिना कपूर, नेहा धुपिया प्रतिक्रिया देतात. मलायका ही खऱ्या अर्थानं फायटर आहे. तिनं खूप काही सहन केले आहे. तिचं वैयक्तिक आयुष्य हे सोशल मीडियावर चर्चेत असलं तरी त्यावर तिनं स्वताला मोल्ड अप करणे मोठी गोष्ट असल्याची चर्चाही यावेळी त्या दोघीजणी करताना दिसतात.

हेही वाचा: Salman Khan: तो साठीच्या जवळ, बॉलिवूडमधली 'ती' तिशीतली! 'डेटिंग' सुरु...

मलायका तिच्या कुत्र्याला घरात काही खायला नाही म्हणून गाडी घेऊन बाहेर पडते. अशावेळी तिला तिची ती अलिशान गाडी कशी चालवायची कळत नाही. तेव्हा तिच्याबाबत जो अपघात झाला याविषयी तिला काही गोष्टी जाणवू लागतात. ती फ्लॅशबॅकमध्ये जाते. आणि ती गाडीतून बाहेर पडते. मलायकानं अशा वेगवेगळया गोष्टींना ग्लोरिफाईड करुन आपण किती ग्लॅमरस आहोत हे दाखवण्याचा पाचंट प्रयत्न केला आहे.

हेही वाचा: Malaika Arora: पन्नाशी गाठली पण तिचं सौंदर्य कमी होईना!

यापूर्वी देखील बॉलीवूडमध्ये वेगवेगळया प्रकारचे डॉक्यु ड्रामा टाईप सीरिज आल्या आहेत. त्यामध्ये ‘The Fabulous Lives of Bollywood Wives’ ही मालिका त्यातल्या त्यात बरी म्हणावी अशी होती. मुळातच अशा स्वरुपाच्या मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा काही सामान्य प्रेक्षक नाही. त्यामुळे त्यांनी या मालिकांच्या वाट्याला जाऊन निराशा करुन न घेणे बरे...