esakal | नुसरत जहाँचे हनिमूनचे फोटो व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

MP Nusrat Jahan Honeymoon photo gets viral

नुसरत जहाँ सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. लग्नानंतर दोन महिन्यांनी नुसरत हनिमूनला गेल्या आहेत. त्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. पण या फोटोंवरूनही त्या ट्रोल झाल्या आहेत. संसदेत जाऊन काम करा, असा टोला नेटकऱ्यांनी त्यांना दिला आहे.

नुसरत जहाँचे हनिमूनचे फोटो व्हायरल

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवविवाहीत आणि नवनिर्वाचित पश्चिम बंगालच्या खासदार नुसरत जहाँ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता त्या त्यांच्या व्हायरल झालेल्या फोटोंमुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.. हे फोटो इतर कुठलेही नसून त्यांच्या हनिमूनचे आहेत. त्यांनी हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेत.

नुसरत जहाँ सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत. लग्नानंतर दोन महिन्यांनी नुसरत हनिमूनला गेल्या आहेत. त्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. पण या फोटोंवरूनही त्या ट्रोल झाल्या आहेत. संसदेत जाऊन काम करा, असा टोला नेटकऱ्यांनी त्यांना दिला आहे.

नुसरत जहाँ ट्रोल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. खासदार झाल्यानंतर त्यांचा एक जुना टिकटॉक व्हिडीओ चर्चेत आला होता आणि त्यावरूनही त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. त्यांनंतर संसदेबाहेर काढलेल्या एका फोटोमुळेही नुसरत आणि खासदार मिमी चक्रवर्ती ट्रोल झाल्या होत्या. त्यानंतर त्याच्या लग्नातील पेहरावामुळे आणि आता श्रावणातील पूजेतील फोटोमुळेही त्या ट्रोल झाल्या होत्या.

नुसरत जहाँ या प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आहेत. कोलकात्याचे व्यावसायिक निखिल जैन यांच्यासोबत त्यांनी विवाह केला आहे. 

loading image