सहावीच्या प्रश्नपत्रिकेत तैमुरबाबत प्रश्न; पालकांची शाळेवर कारवाईची मागणी

प्रश्नपत्रिकेत विचारलं करीना-सैफच्या मुलाचं नाव काय?
kareena saif taimur
kareena saif taimur

मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात एका खासगी शाळेच्या सामान्य ज्ञान परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या मुलाचं नाव विचारल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. इयत्ता सहावीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत करीना-सैफच्या मुलाच्या नावाबाबत प्रश्न विचारल्याने संतापलेल्या पालकांनी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडे शाळेवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाची दखल घेत खांडवा जिल्हा शिक्षणाधिकारी (DEO) संजीव भालेराव यांनी शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. (Taimur)

इयत्ता सहावीच्या परीक्षेच्या सामान्य ज्ञानाच्या पेपरच्या चालू घडामोडी विभागात पाच प्रश्न विचारण्यात आले होते. दुसऱ्या प्रश्नात विद्यार्थ्यांना करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या मुलाचं पूर्ण नाव लिहिण्यास सांगितलं. "सर्वांना माहित आहे की करीना-सैफच्या मुलाचं नाव तैमूर आहे आणि हे देखील सत्य आहे की भूतकाळात आणखी एका तैमूरने आपल्या देशात दहशत माजवली होती. तरीही, त्या दाम्पत्याने त्यांच्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे की विद्यार्थ्यांना परीक्षेत तैमूरचं नाव लिहिण्यास सांगितलं. विद्यार्थ्यांना असा प्रश्न विचारण्याऐवजी जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई यांबाबत प्रश्न शाळेनं प्रश्नपत्रिकेत विचारायला हवे होते. शाळेवर शक्य तितक्या कठोर कारवाईची आमची मागणी आहे", असं पालक मंडळाचे प्रमुख अनिश आरझारे म्हणाले.

या प्रश्नपत्रिकेतील दुसऱ्या प्रश्नाबाबत पालकांची कोणतीच तक्रार नव्हती. उत्तर कोरियाच्या हुकूमशहाबाबत हा प्रश्न होता. खांडवा जिल्हा शिक्षण अधिकारी संजीव भालेराव यांच्या म्हणण्यानुसार, ही बाब गुरुवारी त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर संबंधित शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. "शाळेच्या पालक मंडळानेही या प्रश्नावर आक्षेप घेतला आहे आणि मलाही वैयक्तिकरित्या असं वाटतं की पालकांच्या भावना दुखावणारा असा प्रश्न प्रश्नपत्रिकेत विचारला नाही पाहिजे," असं भालेराव म्हणाले. मात्र, संबंधित प्रश्न कसा अयोग्य आहे याबाबत ते स्पष्टीकरण देऊ शकले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com