मिसेस मुख्यमंत्री मालिकेत आता समर आणि सुमीची होणार ताटातुट

वृत्तसंस्था
Saturday, 28 September 2019

सध्या मालिकेमध्ये अनेक गंमतीजंमती चालू आहेत. लग्न झाल्यानंतर सुमी- समरच्या नात्यातील आणि सुमीच्या नव्या घरातील गंमती पाहण्यासारख्या आहेत.

मुंबई : झी मराठी चॅनलवरील मालिका या सतत टिआरपीच्या स्पर्धेत असतात. या चॅनलवरील जवळपास सर्वच मालिका प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत. त्यातील चला हवा येऊ द्या, माझ्या नवऱ्याची बायको, स्वराज्यरक्षक संभाजी, तुझ्यात जीव रंगला आणि रात्रीस खेळ चाले या मालिका टिआरपीच्या आकड्यात पुढे असल्याचं कळते. तरी मात्र या सर्व जुन्या मालिकांना टक्कर देणारी नवी मालिका म्हणजे 'मिसेस मुख्यमंत्री'. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

फक्त ६ दिवस बाकी #mrsmukhyamantri #zeemarathi

A post shared by Amruta Dhongade (@amrutadhongadeofficial) on

सध्या मालिकेमध्ये अनेक गंमतीजंमती चालू आहेत. लग्न झाल्यानंतर सुमी- समरच्या नात्यातील आणि सुमीच्या नव्या घरातील गंमती पाहण्यासारख्या आहेत. मात्र दुसरीकडे सुमीची सासू काहीशी नाराज आहे. कारण, त्यांच्या खांदानाला शोभणारं असं लग्नानंतरच सुमीचं नाव समरने ठेवावं अशी त्यांची इच्छा होती. समर मात्र तिचं लग्नानंतरच नाव बदलण्याल नकार देतो. एकुणच सासूबाईंना फारशी पसंत नसलेली सून घरात आली आहे आणि आता तिला घराबाहेर काढण्याचा निश्चर्य त्यांनी केलाय. सुमीची पाठराखीण करण्यासाठी आलेल्या आजीने समरला सोळा दिवस भेटता येणार नाही असं सांगितलं आहे. आता समर त्याच्या लाडक्या सुमीला भेटण्यासाठी कोणत्या शक्कल लढवणार हे बघण्याजोगे असेल. 

काही महिन्यांपूर्वी आलेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं आहे. सध्या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास यश मिळवलं आहे. सुमीचा गावरानपणा प्रेक्षकांना भावला आहे आणि त्यामुळेच ही मालिका टिआरपी रेटच्या चौथ्या स्थानावर आहे. 

नुकतचं या मालिकेने वेगळं वळण घेतलं आहे. रविवारी (22 सप्टेंबर) ला दोन तासाच्या विशेष भागामध्ये लग्न पार पडले. अखेर सुमी आणि समर लग्नबंधनात अडकले आहेत. बऱ्याच काळापासून प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो सुमी आणि समरचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसमारंभाचे फोटो इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झाले. नेटकरी सध्या या फोटोंवर आणि खासकरुन या जोडीवर फिदा आहेत. हळदीपासून लग्नापर्यंतचे फोटो अभिनेत्री अमृता धोंगडे (सुमी) आणि तेजस बर्वे (समर) यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

6days to go. . Photo : @shekhar101sawant #samar #sumi #MrsMukhyamantri #preweddingshoot #couplegoals

A post shared by Tejas Barve (@tejas.barve_) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Mrs Mukhyamantri Serial newly married samar and sumi now allowed to meet