Sargam Koushal: सरगम ​​कौशल जिंकलंस! तब्बल 21 वर्षांनी भारताकडे 'मिसेस वर्ल्ड'चा किताब.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mrs world 2022 sargam kaushal brings back the crown to india after 21 years

Sargam Koushal: सरगम ​​कौशल जिंकलंस! तब्बल 21 वर्षांनी भारताकडे 'मिसेस वर्ल्ड'चा किताब..

Mrs. World 2022 Sargam Koushal: भारतासाठी अत्यंत मानाचा आणि अभिमानाचा असा आजचा क्षण आहे. नुकतीच एक ऐतिहासिक घटना घडली, ती म्हणजे तब्बल २१ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारताला 'मिसेस वर्ल्ड' हा किताब मिळाला आहे. जम्मू काश्मीरच्या सरगम ​​कौशलने (Sargam Koushal) अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या 'मिसेस वर्ल्ड 2022-23 'चे विजेतेपद पटकावले आहे. हा किताब मिळाल्यानंतरचे सरगमचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. २१ वर्षांनी भारताला हा मान मिळवून दिल्याबद्दल सरगमवर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

(Mrs world 2022 sargam kaushal brings back the crown to india after 21 years)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: कौतुकानं घात केला!पुण्याची टॉकरवडी अमृता देशमुख घराबाहेर..

सरगम ​​कौशल ही जम्मू-काश्मीरची रहिवासी आहे. सरगम शिक्षिका आणि मॉडेलही आहे. आपलं करियर करत असतानाच 2018 मध्ये तिने लग्न केले आणि लग्नानंतर लगेचच तिने अशा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मिसेस इंडियासाठी tine दमदार तयारी केली आणि 'मिसेस इंडिया 2022-23' हा किताब तिने पटकावला.

हेही वाचा: Raj Thackeray: म्हणून राज ठाकरेंना 'साहेब' म्हणावंसं वाटतं.. अभिनेत्याची ही पोस्ट वाचाच..

21 वर्षांपूर्वी अभिनेत्री अदिती गोवित्रीकरने (Aditi Govitrikar) हा किताब जिंकला होता. त्यानंतर सरगमने हा किताब भारताला मिळवून दिला. अमेरिकेत पार पडलेल्या या सोहळ्यात अदिती गोवित्रीकरही उपस्थित होत्या. सरगमच्या विजयाचा त्यांना प्रचंड आनंद झाला. या विजया बद्दल आदिती गोवित्रीकर यांनीही सरगम ​​कौशलचे अभिनंदन केले. 'हार्दिक अभिनंदन सरगम.. या प्रवासाचा एक भाग झाल्याबद्दल खूप आनंद झाला.. 21 वर्षांनंतर तो मुकूट पुन्हा एकदा भारतात आला...' अशा शब्दात आदिती यांनी सरगमसाठी खास पोस्ट शेयर केली आहे.