विराट कोहलीच्या प्रेमात वेडी होती मृणाल ठाकूर; अनेक वर्षांनी खुलासा करत म्हणाली...Mrunal Thakur Madly in love with Virat Kohli, | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mrunal Thakur Madly in love with Virat Kohli,Details Inside

Mrunal Thakur: विराट कोहलीच्या प्रेमात वेडी होती मृणाल ठाकूर; अनेक वर्षांनी खुलासा करत म्हणाली...

Mrunal Thakur: भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार विराट कोहली जगभरातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. जगभरात त्याचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मैदानावरी त्याचा खेळ पाहून अनेकजण त्याच्या प्रेमात पडतात हे वेगळं सांगायला नको.

त्याच्या लाइफस्टाइलसोबतच त्याच्या मैदानावरील अॅटिट्युडमुळे तसंच त्याच्या स्पष्ट विचारांमुळे देखील त्याला फॉलो करणारे अनेकजण आहेत. त्याच्या चाहतावर्गात मोठी संख्या आहे ती महिलांची. इतकंच नाही तर बॉलीवूड सेलिब्रिटी देखील त्याला पसंत करतात. यामध्ये काही अभिनेत्रींचा देखील समावेश आहे.(Mrunal Thakur Madly in love with Virat Kohli,Details Inside

हेही वाचा: Viral Video: प्रभास आणि क्रिती सननचं नातं कन्फर्म; वरुण धवननं दिली मोठी हिंट, म्हणाला...

अभिनेत्री मृणाल ठाकूरनं देखील मान्य केलं आहे की एकेकाळी ता विराट कोहलीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. विराटला निळ्या जर्सीत खेळताना पाहून आपण त्याच्या कधी प्रेमात पडलो हे आपल्यालाचा कळालं नाही असं देखील मृणाल म्हणाली. याविषया पुढे खुलासा करत अभिनेत्री म्हणाली की, ''तिला क्रिकेट हा खेळ प्रचंड आवडतो. या खेळाची आवड आपल्याला आपल्या भावामुळे लागली. आपल्या शाळेच्या दिवसांत आपण खेळांत अधिक तरबेज होतो असं देखील ती म्हणाली''.

मृणाल पुढे म्हणाली की, आपल्या टीनएज मध्ये ती खेळांविषयी खूपच उत्साही होती,काही मोठ्या स्पर्धांमध्ये देखील ती खेळली आहे. फुटबॉल आणि बास्केटबॉल या खेळांमध्ये तिला अधिक आवड होती. नुकत्याच एका मुलाखतीत तिनं म्हटलं आहे की,एक वेळ होती जेव्हा विराट कोहली मला खूप आवडायचा. मला माझ्या भावामुळे क्रिकेट पहायची आवड लागली,तो क्रिकेटचा मोठा चाहता आहे. ५ एक वर्षापूर्वी मी माझ्या भावासोबत लाइव्ह मॅच पाहिली होती ज्याच्या खूप चांगल्या आठवणी माझ्याकडे आहेत. मला आठवतंय मी निळी जर्सी परिधान केली होती आणि भारतीय टीमसाठी चिअर करत होती.

मृणालच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर, तेलुगु भाषेतील रोमॅंटिक सिनेमा 'सीता रामम' मध्ये तिला पाहिलं गेलं होतं. यात दुलकर सलमान आणि रश्मिका मंदाना देखील होते. याव्यतिरिक्त मृणालनं 'सुपर ३०','तुफान', 'बाटला हाऊस', 'लव सोनिया' आणि 'घोस्ट स्टोरीज' सारख्या सिनेमांतूनही उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या तिच्या सिनेमांमध्ये कार्तिक आर्यन सोबतचा 'धमाका' आणि शाहिद कपूर सोबतचा 'जर्सी' देखील सामिल आहेत.