ई सकाळ Exclusive : आॅनलोकेशन लाईव्हला नेटकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर.
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

ई सकाळच्या माध्यमातून सतत नवेनवे उपक्रम राबवले जात आहेत. त्या सर्वच उपक्रमांना आॅनलाईन विश्वातून मोठा विक्रमी प्रतिसाद मिळतो आहे. त्यातच एक नवा प्रयोग ई सकाळच्या टीमने केला. सिनेमाचं सुूरू असलेलं शुटिंग आपण जाता जाता पाहात असतो. पण हे शुट नेमकं कसं चालतं याचा प्रत्यक्ष अनुभव ई सकाळच्या सर्व नेटकऱ्यांना आला. या चित्रिकरणाचा भाग म्हणून कोथरूडच्या भाजी मार्केटमध्ये झालेला गोळीबार.. झालेली पळापळ लोकांनी अनुभवली आणि सर्वात महत्वाचं व्हॅनिटी व्हॅन आतून असते तरी कशी याचा अनुभवही त्यांनी घेतला. निमित्त होते मुळशी पॅटर्न या चित्रपटाच्या शुटिंगचे. दिग्दर्शक प्रवीण तरडे, कलाकार उपेंद्र लिमये, सुनील अभ्यंकर, कॅमेरामन महेश लिमये अशी सगळी टीम यावेळी हजर होती. 

पुणे : ई सकाळच्या माध्यमातून सतत नवेनवे उपक्रम राबवले जात आहेत. त्या सर्वच उपक्रमांना आॅनलाईन विश्वातून मोठा विक्रमी प्रतिसाद मिळतो आहे. त्यातच एक नवा प्रयोग ई सकाळच्या टीमने केला. सिनेमाचं सुूरू असलेलं शुटिंग आपण जाता जाता पाहात असतो. पण हे शुट नेमकं कसं चालतं याचा प्रत्यक्ष अनुभव ई सकाळच्या सर्व नेटकऱ्यांना आला. या चित्रिकरणाचा भाग म्हणून कोथरूडच्या भाजी मार्केटमध्ये झालेला गोळीबार.. झालेली पळापळ लोकांनी अनुभवली आणि सर्वात महत्वाचं व्हॅनिटी व्हॅन आतून असते तरी कशी याचा अनुभवही त्यांनी घेतला. निमित्त होते मुळशी पॅटर्न या चित्रपटाच्या शुटिंगचे. दिग्दर्शक प्रवीण तरडे, कलाकार उपेंद्र लिमये, सुनील अभ्यंकर, कॅमेरामन महेश लिमये अशी सगळी टीम यावेळी हजर होती. 

मुळशी पॅटर्न Live

कोथरूड भाजी मंडईमध्ये हे लाईव्ह कव्हरेज जवळपास 50 मिनिटे चाललं. यावेळी जगभरातल्या तब्बल 34 हजार प्रेक्षकांनी याचा अनुभव घेतला. डिजिटल विश्वामध्ये आॅनलोकेशन लाईव्ह हा प्रकार पहिल्यांदाच घडवून आणला तो ई सकाळने. याबद्दल अनेकांनी  ई सकाळचे विशेष अभिनंदनही केले.

हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. मुळशी तालुका कुस्ती, पोलीस, वारकरी यांच्यासाठी ओळखला जातो. त्याचपद्धतीने मुळशीच्या अनेक नामचिन गुंडांनी पुण्यासह मुंबईवरही दहशत निर्माण केली होती. याच अवतीभवती हा चित्रपट फिरतो. आॅनलोकेशन लाईव्हचा अनुभव कमाल असल्याचं कलाकारांनीही मान्य केलं.  

Web Title: Mulshi pattern new marathi cinema on location FB live by Soumitra Pote esakal