
जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण?
कंगनाला झटका; मानहानीचा खटला हस्तांतरित करण्यास कोर्टाचा नकार
गीतकार व लेखक जावेद अख्तर यांनी दाखल केलेला मानहानीचा खटला हस्तांतरित करण्यासाठीची अभिनेत्री कंगना रणौतची याचिका किला कोर्टाने फेटाळली. मानहानीचा खटला अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयातून इतर न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यात यावी अशी मागणी कंगनाकडून करण्यात आली होती. न्यायाधीशांवर विश्वास नाही, असं सांगत तिने याचिका दाखल केली होती. मात्र तिची ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अख्तर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सोशल मीडियावर ही मुलाखत मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. मात्र हे आरोप तथ्यहीन आणि बोगस आहेत, असा आरोप अख्तर यांनी दंडाधिकारी न्यायालयात केलेल्या मानहानीच्या दाव्यात केला आहे. पोलिसांनी यावर फौजदारी फिर्याद दाखल करुन कंगनाला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले. तसेच अंधेरी न्यायालयानेदेखील कंगनाला न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. कंगनाने सुनावणीला हजेरी लावली, मात्र त्यानंतर तिने मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात स्वतंत्र दावा दाखल केला आणि संबंधित अंधेरी न्यायालयातील खटला अन्य न्यायालयात वर्ग करण्याची मागणी केली होती. अंधेरी न्यायालयाने स्वतंत्रपणे या प्रकरणात चौकशी केली नाही तर वांद्रे पोलिसांना चौकशी करण्याचे निर्देश दिले, असा युक्तिवाद तिच्या वतीने करण्यात आला होता.
कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अख्तर यांच्याबाबत विधान केली होती. ही मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्याला लाखो हिट्स मिळाल्या आहेत. मात्र संबंधित विधानं बोगस आणि आधारहीन असून यामध्ये तथ्य नाही असा आरोप अख्तर यांनी केला.