esakal | कंगनाविरोधातील जावेद अख्तर यांच्या याचिकेवर सुनावणी कोर्टाचा नकार
sakal

बोलून बातमी शोधा

kangana Ranaut

कंगनाविरोधातील जावेद अख्तर यांच्या याचिकेवर सुनावणी कोर्टाचा नकार

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची क्वीन कंगना राणावत (kangana ranaut) आणि प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (javed akhatar) यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यावरुन मोठी चर्चा बॉलीवूडमध्ये झाली. अनेकांनी त्याच्यात भागही घेतला. मात्र कंगना आणि जावेद अख्तर यांच्यातील वाद कायम आहे. तो इतका वाढला की, तो न्यायालयापर्यत जाऊन पोहचला आहे. कंगनाच्या विरोधातील याचिका अख्तर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र न्यायालयानं त्यावर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. जेव्हा ही केस न्यायालयात दाखल झाली होती तेव्हापासून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत होती. ( mumbai high court refuses to hear javed akhtar plea alleging kangana ranaut passport renewal yst88)

कंगनानं न्यायालयाला खोटी माहिती दिली आहे. असा आरोप जावेद अख्तर यांनी कोर्टाला केलेल्या याचिकेमध्ये केला आहे. कंगनानं आपल्याला पासपोर्टच्या नुतनीकरणाबद्दल खोटी माहिती सादर केली होती. अशी माहिती दिली. या याचिकेवर न्यायालयानं गीतकार जावेद अख्तर यांच्या त्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. त्या याचिकेमध्ये असा आरोप करण्यात आला होता की, अभिनेत्री कंगनाच्या वकिलानं कोर्टात गैरहजेरीच्या प्रकरणावरुन पासपोर्टचे प्रकरण उजेडात आणले.

जावेद अख्तर यांचे वकील वृंदा ग्रोव्हर यांनी सांगितले की, कंगनाव्दारे दिलेला जवाब हा फसवा होता. त्यात खोटेपणा होता. यावर वृंदा यांनी पासपोर्ट नुतनीकरण याविषयी चूकीची माहिती दिली होती. त्यामुळे हे प्रकरण वेगळ्या दिशेनं भरकटत गेल्याचे दिसुन आले. याप्रकरणावर न्यायाधीश एस एस शिंदे आणि न्यायाधीश एन जे जमादार यांच्या बेंचनं सांगितले, ज्या याचिकेवर हस्तक्षेप घ्यावा असे सांगण्यात आले होते त्यात कोर्टानं एका याचिकेवर हस्तक्षेप घेण्याची परवानगी दिली होती. आता कोर्टानं प्रत्येक याचिकेवर घेतलेल्या हस्तक्षेपाला परवानगी देण्याची परवानगी दिली तर कोर्टात रांग लागेल. असं कोर्टानं सुनावलं.

loading image
go to top