esakal | मुंबईच्या पोलिसांवर भरवसा नाही; अभिनेत्री तनुश्री दत्ताचे खळबळजनक विधान
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईच्या पोलिसांवर भरवसा नाही; अभिनेत्री तनुश्री दत्ताचे खळबळजनक विधान

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक वाद-विवाद आणि आरोप-प्रत्यरोप केले जात आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत घराणेशाही आहे आणि या घराणेशाहीचा बळीसुशांत ठरला आहे असे काही कलाकारांनी म्हटलेले आहे, तर काही जणांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली आहे.

मुंबईच्या पोलिसांवर भरवसा नाही; अभिनेत्री तनुश्री दत्ताचे खळबळजनक विधान

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे


मुंबई ः अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक वाद-विवाद आणि आरोप-प्रत्यरोप केले जात आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत घराणेशाही आहे आणि या घराणेशाहीचा बळीसुशांत ठरला आहे असे काही कलाकारांनी म्हटलेले आहे, तर काही जणांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली आहे.

कभी खुशी कभी दुरी रक्षाबंधन; कलाकारांमध्येही रंगला ऑनलाईन रक्षाबंधनाचा सोहळा

दिवसेंदिवस  प्रकरणाला नवे वळणमिळत आहे. आता अभिनेत्री तनुश्री दत्ताचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्याने तिने म्हटले आहे की  ‘मुंबई पोलिसांवर विश्वास नाही.’ आता तनुश्रीच्या या नव्या व्हिडीओमुळे सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण वेगळे वळण घेणार असे दिसते. कारण बिहारचे पोलिस येथे आले आहेत आणि तेदेखील तपास करीत आहे. त्यामुळे आता काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

लतादीदींच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना रक्षाबंधनानिमित्त शुभेच्छा....

तनुश्री म्हणते की माझ्याबरोबर झालेल्या गैरप्रकाराबद्दल काही जणांची चौकशी झालीच नागी. उलट आमचीच चौकशी अनेकदा झाली. आम्हाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांवर अजिबात विश्वास ठेवता येणार नाही. अशा प्रकरणात ते खूप घाई करतात आणि राजकीय नेत्यांचीही त्यांना साथ मिळते. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. 

---------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे