esakal | मुंबई पोलिसांनी सिद्धार्थची कार केली जप्त; काल रात्री काय घडलं?
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई पोलिसांनी सिद्धार्थची कार केली जप्त; काल रात्री काय घडलं?

मुंबई पोलिसांनी सिद्धार्थची कार केली जप्त; काल रात्री काय घडलं?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला sidharth shukla याचं निधन passed away झालं आहे. त्याच्या जाण्यानं मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. हदयविकाराच्या झटक्यानं त्याचं निधन झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र आता त्याबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या शंकाही व्यक्त केल्या जात आहे. त्यावरुन चर्चेला तोंड फुटल्याचे दिसून आले आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या जाण्यानं मनोरंजन क्षेत्रातील अनेकांना धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात मुंबई पोलिसांनी त्याची कार जप्त केली आहे. त्यामुळे त्यातून नेमक्या गोष्टी समोर येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

गेल्या काही तासांपासून सिद्धार्थच्या बाबत वेगवेगळे अपडेट्स समोर येताना दिसत आहे. काल रात्री त्याच्या गाडीला अपघात झाला आणि त्याच्या गाडीची काच फुटल्याचे दिसून आले आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण वेगळे वळण घेताना दिसत आहे. अजून सिद्धार्थचे शवविच्छेदन झाले नसल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे त्या काल रात्री नेमकं काय झालं होतं हे अजूनही ठामपणे समोर आलेले नाही. मात्र त्याची वेगवेगळ्या प्रकारे चर्चा सुरु झाली. सोशल मीडियावरही चर्चा आहे. सिद्धार्थच्या जाण्यानं बॉलीवूडमधील अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

बॉलीवूडचे अनेक सेलिब्रेटी सिद्धार्थच्या घरी पोहचले आहेत. त्यांनी त्यांच्या परिवाराप्रती शोक व्यक्त केला आहे. ओशिवरा बिल्डिंगमध्ये सिद्धार्थचे दोन फ्लॅट होते. त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, तो जेव्हा रात्री घरी आला तेव्हा त्याच्या गाडीची काच फुटलेली दिसून आली. दुसऱ्या दिवशी पाहिले असता सिद्धार्थचा मृत्यु झाल्याची बातमी सगळीकडे पसरली. मात्र पोलिसांकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यांनी रुग्णालयाच्या वतीनं कोणतेही स्टेटमेंटही दिलेलं नाही. सिद्धार्थचा हद्यविकाराच्या झटक्यानं मृत्यु झाला. असे आतापर्यत सांगण्यात आले आहे.

loading image
go to top