Munawar Faruqui: बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यावर मुनावरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला.."डोंगरीमध्ये आज.."

मुनावर फारुकीने बिग बॉसच्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरलंय
munawar faruqui first reaction after win bigg boss 17 grand finale
munawar faruqui first reaction after win bigg boss 17 grand finale SAKAL

Munawar Faruqui Bigg Boss 17 News: मुनावर फारुकीने रिॲलिटी टेलिव्हिजन शो 'बिग बॉस 17' ची ट्रॉफी जिंकली आहे.

मुनावर हा पहिल्या दिवसापासून सर्वात मजबूत आणि चाहत्यांच्या आवडत्या स्पर्धकांपैकी एक होता. आणि त्याने विजेता बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरल्यावर स्वतःचा खेळ सिद्ध केला.

munawar faruqui first reaction after win bigg boss 17 grand finale
Filmfare Awards 2024: '12th फेल' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, तर हा अभिनेता - अभिनेत्री ठरले अव्वल

ट्रॉफी जिंकल्यावर मुनावरची पहिली प्रतिक्रिया

बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यावर फोटो शेअर करताना मुनावरने कॅप्शनमध्ये लिहिले की, "जनता, तुम्हाला खुप खुप धन्यवाद! तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे बिग बॉसची ट्रॉफी डोंगरीत आणली आहे. तुमच्या सर्व मार्गदर्शनासाठी मोठ्या भावासारखा असणाऱ्या सलमान खान यांचे विशेष आभार. संपूर्ण #munawarkijanta आणि #munawarkewarrior या सर्वांचे मनापासून धन्यवाद."

मुनावरवर बक्षीसांचा वर्षाव

मुनावर बिग बॉस जिंकताच त्याला ट्रॉफी, 50 लाख रुपये आणि एक आलिशान कार भेट म्हणून मिळाली आहे. ट्रॉफी जिंकल्यानंतर मुनावरने सोशल मीडियावर सलमान खानसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्याच्या चाहत्यांना सतत पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले.

अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, अरुण माशेट्टी आणि मन्नारा चोप्रा हे देखील पहिल्या पाच अंतिम फेरीत होते. अरुण आणि अंकिता यांना प्रथम फिनालेमधून बाहेर जावे आले. आणि मन्नारा या शोची दुसरी उपविजेती ठरली. अभिषेक कुमार आणि मुनावर फारुकी यांच्यात अंतिम सामना झाला आणि नंतर ट्रॉफी जिंकली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com