'मुन्नाभाई' आणि 'सर्किट' परत येतायत! पण कधी..? 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

मुंबई : अभिनेता संजय दत्तच्या कारकिर्दीला वेगळे वळण देणाऱ्या 'मुन्नाभाई' मालिकेतील तिसऱ्या भागाची प्रतीक्षा चित्रपट रसिक अनेक वर्षे करत होते. आता अखेर या चित्रपटाची कथा तयार झाली आहे, अशी माहिती खुद्द अर्शद वारसी यानेच दिल्यामुळे पुढील एक-दीड वर्षांत हा चित्रपट प्रदर्शित होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

'या चित्रपटाची कथा तयार झाली असून 2019 मध्येच याचे चित्रिकरणही होईल', अशी माहिती वारसी याने दिल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. त्यावरून 'मुन्नाभाई 3'ची जोरदार चर्चा सुरू झाली.

अखेर वारसी याने या विधानाचे स्पष्टीकरण देत सांगितले, की चित्रिकरण कधी सुरू होईल, याची नेमकी माहिती नाही. ''मुन्नाभाई 3' वर काम सुरू असल्याचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी सांगितले होते. त्यावरून मी अंदाज बांधला', असे वारसी याने सांगितले. 'या वर्षअखेरीस 'मुन्नाभाई 3'चे चित्रिकरण सुरू होईल, अशी आशा आहे. पण ही फक्त आशाच आहे. त्यात फार तथ्य नाही', असा खुलासा त्याने नंतर केला. 

या मालिकेतील शेवटचा चित्रपट 'लगे रहो मुन्नाभाई' 2006 मध्ये झळकला होता. त्यानंतर 'मुन्नाभाई चले अमेरिका' या तिसऱ्या भागावर काम सुरू झाल्याचेही सांगितले जात होते. पण संजय दत्तला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्याने हा चित्रपट बासनात गुंडाळला गेला. त्यानंतर आता तब्बल 13 वर्षांनंतर या संदर्भात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Munnabhai 3 likely to go on floors in 2019, indicates Arshad Warsi