'भाऊंचा केसांबरोबर मेंदूही उडून गेला आहे'

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 25 January 2021

देशाचे दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

मुंबई -भारतीय लोकांच्या मनात घर करुन असलेलं देशभक्तीपर गाणं म्हणजे ए मेरे वतन के लोगो हे गाणे. मात्र आता त्या गाण्यावरुन प्रसिध्द संगीतकार विशाल ददलानीला मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागत आहे. सोशल मीडियावर त्यामुळे त्याच्यावर टीका होत आहे.

देशाचे दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्याच्या वक्तव्याचा निषेधही केला जात आहे. त्यामुळे ट्रोल होत आहे. दुसरे म्हणजे त्याने आपल्या त्या विधानाबद्दल माफीही मागितली. मात्र त्याचे ते विधान त्याला चांगलेच त्रासदायक ठरले आहे.  इंडियन आयडॉल या कार्यक्रमात चुकीचा इतिहास सांगितल्यामुळे त्याला ट्रोल व्हावे लागले आहे.  काही दिवसांपूर्वी इंडियन आयडॉल या कार्यक्रमातील एका स्पर्धकाने ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गाणे सादर केले होते. हे गाणं ऐकल्यानंतर विशालने या स्पर्धकाचं कौतूक केलं. सोबतच तिला या गाण्यामागचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो चुकीचा संदर्भ दिल्यामुळे विशालवर टीका केली जात आहे.

‘ए मेरे वतन के लोगो’ हे गाणं गायिका लता मंगेशकर यांनी 1947 मध्ये पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यासमोर गायलं होतं, असं विशाल ददलानी म्हणाला. त्याचं हे वाक्य ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी त्याला इतिहास नीट पाहण्याचा सल्ला दिला आहे. तर, चुकीचा इतिहास सांगणाऱ्या व्यक्तीला परिक्षक पदावरुन हटवा असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

मात्र, झालेल्या प्रकारानंतर विशाल ददलानीने माफी मागितली आहे. 1962 मध्ये भारत-चीन युद्धादरम्यान शहिद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ लता मंगेशकर यांनी हे गाणं गायलं होतं. कवी प्रदीप यांनी हिंदीमध्ये हे गाणं लिहिलं असून लता मंगेशकर यांनी 26 जानेवारी 1963 मध्ये दिल्ली येथे गायलं होतं.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: music director and indian iodl judge vishal dadlani trolls from twitter user for song ae mere watan ke logo