'माशाअल्लाह','दबंग' ते 'भाई भाई',  बॉलीवूडमधील वाजिद यांची सुपरहिट गाणी

दिपाली राणे-म्हात्रे, प्रतिनिधी
सोमवार, 1 जून 2020

बॉलीवूडमधील वाजिद यांची अनेक गाणी प्रेक्षकांची आवडती गाणी आहेत. पाहुयात या गाण्यांची एक झलक.

मुंबई- बॉलीवूडची प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिद मधील वाजिद खान यांचं आज सकाळी निधन झालं. या दोन भावांच्या जोडीने एकत्र येऊन अनेक सिनेमांना संगीत दिलं आहे. बॉलीवूडच्या प्रसिद्ध संगीतकारांच्या जोडीमधील ही एक जोडी होती. किडनी आणि हृदयाच्या आजारामुळे वाजिद यांचं निधन झालं. या उपचारांदरम्यान वाजिद यांच्या टेस्टमध्ये कोरोनाची टेस्ट देखील पॉझिटीव्ह आली होती. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. बॉलीवूडमधील वाजिद यांची अनेक गाणी प्रेक्षकांची आवडती गाणी आहेत. पाहुयात या गाण्यांची एक झलक.

हे ही वाचा: 'या' कारणामुळे वाजिद खान सलमानला मानायचा गॉडफादर 

२००७ मध्ये 'पार्टनर' या सिनेमातील 'सोनी दे नखरे' हे सलमान, कतरिना आणि गोविंदावर चित्रीत झालेलं गाणं. 

२००८ मधील 'गॉड तुस्सी ग्रेट हो' सिनेमातील 'तुझे अक्सा बीच घुमा दूं' हे सलमानवर चित्रीत झालेलं गाणं.  

२००९ मधील 'वाँटेड' या सिनेमातील 'मेरा ही जलवा' हे सलमान खानवर चित्रीत झालेलं गाणं.

२००९ 'वॉन्टेड' सिनेमातील 'लव मी'  हे सलमानवर चित्रीत झालेलं गाणं. वाजिद खान आणि अमृता काक यांनी हे गाणं गायलंय.  

२०१० मधील 'वीर' या सिनेमातील 'सुरीली अखियों वाले' हा झरिन खान आणि सलमानवर चित्रीत झालेलं गाणं.

२०१० मधील 'दबंग' सिनेमातील 'हुड हुड दबंग' हे सलमानचं प्रसिद्ध गाणं.

२०१२ मधील 'एक था टायगर' या सिनेमातील 'माशाअल्लाह' हे सलमान आणि कतरिनावर चित्रीत झालेलं गाणं. वाजिद यांनी श्रेया घोषाल यांनी हे गाणं गायलंय.  

२०१२ मधील 'दबंग २' सिनेमातील 'फेविकोल से' हे सलमान आणि करिना कपूर खानवर चित्रीत झालेलं गाणं. वाजिद आणि ममता शर्मा यांनी हे गाणं गायलंय.   

२०२० मधील सलमान खानवर चित्रीत झालेलं आणि त्याने स्वतः गायलेलं 'भाई-भाई' हे गाणं.

music director wajid khan passses away know about his sajid wajid songs


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: music director wajid khan passses away know about his sajid wajid songs