'ऑटो रोमान्स इन मुंबई' चित्रपटाचे म्युझिक लाॅन्च

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

ऑटो रोमान्स इन मुंबई जेजुरी क्रिएटीव्ह प्रोङाक्शन बॅनरखाली निर्मिती झालेला पहिला कमर्शियल बिग बजेट हिंदी चित्रपटाचा नुकताच पोस्टर्स, प्रोमो आणि म्युझिक लाॅन्च मुंबईतील अंधेरी येथे पत्रकार व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

ऑटो रोमान्स इन मुंबई जेजुरी क्रिएटीव्ह प्रोङाक्शन बॅनरखाली निर्मिती झालेला पहिला कमर्शियल बिग बजेट हिंदी चित्रपटाचा नुकताच पोस्टर्स, प्रोमो आणि म्युझिक लाॅन्च मुंबईतील अंधेरी येथे पत्रकार व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी निर्माती अंजली शर्मा, दिग्दर्शक शक्तीशंकर, अभिनेते सिध्दार्थ जाजू, अवंतिका मिश्रा, कॅप्टन तुषार जोशी, शिवसेना नेते विजय कामटेकर, भाजपा नेते गजानन बारवाल आदि चित्रपटातील इतर कलाकार, तंत्रज्ञ व चित्रपट राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. चित्रपटाचे म्युझिक लाॅन्च शोभा जाजू अभिनेते सिध्दार्थ जाजू यांच्या मातोश्री व पोस्टर्स, प्रोमोचे उदघाटन शितल अविनाश, निरंजन के. यांच्या हस्ते करण्यात आले.

पूर्वी प्रेम करणारे आपल्या नजरेतून ह्या भावना एकमेकांना पोहचवित असत. डोळ्यात उत्कट प्रेमाचे भाव एकमेकांना कळत असतं. पण आताच प्रेम हे सुसाट वाहत चालले आहे. हे प्रेमी युगुल एकमेकांना भेटण्यासाठी आतुर असतात. देऊळ, सिनेमागृह आता माॅल या त्यांच्या भेटण्याच्या हमखास जागा पण आता या जागा टॅक्सी ऑटोरिक्षा हा पर्याय त्यांनी निवडला आहे. असाच मजेदार धागा पकडून निर्माती अंजली शर्मा यांनी ऑटो रोमान्स ईन मुंबई या हिंदी चित्रपटाची निर्मिती केलीआहे. शक्ती शंकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शन केले आहे. ऑटो रोमान्स.. हा सत्य परिस्थितीवर आधारित आहे आणि हा विषय आम्ही पाॅझिटीव्ह पध्दतीने मांडला आहे.

प्रेक्षक नक्की एन्जाॅय करतील. असे दिग्दर्शक शक्तीशंकर यांनी सांगितले. चित्रपटातील पाच गाणी कुणाल  गांजावाला, अभिजीत भट्टाचार्य, विनोद राठोड अशा नामवंत गायकांनी गायली आहेत. चित्रपटाला मी स्वतः संगीत दिग्दर्शन केले आहे. शास्त्रीय संगीताच्या विशेष असल्यामुळे यातील गाण्यामध्ये राग यमन, बोलावलं, शिवरंजनी याचा मी गाण्यामधे वापर केला आहे असे  संगीतकार  सिद्धार्थ जाजू यांनी सांगितले. दिग्दर्शक शक्तीशंकर यांचे माझे ट्युनिंग चांगले आहे.पहीव्या पासुन आम्ही चांगले मित्र आहोत. यापूर्वी आम्ही पांच मराठी चित्रपट एकत्र काम केले आहे. कॅमेरामन नातु सिंग, हितेश बेलदा, संकलन सुनिल यादव, अॅक्शन सिंग इज किंग, कला दिग्दर्शन निरंजन यांचे आहे. ऑटो रोमान्स.... या चित्रपटात सिद्धार्थ जाजू यांची अॅक्शन, रोमॅन्टीक हीरो अशी महत्वाची भूमिका आहे. सोबत अवंतिका मिश्रा, सानिया, विल्सन, रशीद,अलका आणि शक्तीशंकर यांच्यासह अनेक नविन कलाकारांना आणि मुंबईतील अनेक ऑटो रिक्शा चालकांना संधी देण्यात आली आहे. 11 मे रोजी महाराष्ट्र व इतर ठिकाणी एकुण 1200 ते 1500 चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: music launch of auto romance in mumbai