Arun Govil Viral Video : याला म्हणतात खरा भारत! मुस्लिम कुटूंबियानं 'रामायण' मालिकेतील रामासोबत काढला फोटो

रामानंद सागर यांच्या रामायण नावाच्या टीव्ही मालिकेची लोकप्रियता मोठी आहे.
Muslim Family Clicked Photo With Ramayan Ram Arun Govil
Muslim Family Clicked Photo With Ramayan Ram Arun Govilesakal

Muslim Family Clicked Photo With Ramayan Ram Arun Govil : रामानंद सागर यांच्या रामायण नावाच्या टीव्ही मालिकेची लोकप्रियता मोठी आहे. भारतातील सर्वाधिक पाहिली गेलेली आणि प्रेक्षकांचा सर्वाधिक प्रतिसाद असलेली मालिका म्हणून रामायणकडे पाहिले गेले. त्यात अरुण गोविल यांनी श्रीराम यांची भूमिका साकारली होती.

आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात एक मुस्लिम कुटूंबीय अरुण गोविल यांच्यासमवेत फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. ९० च्या दशकांतील सर्वाधिक चर्चेतील आणि लोकप्रिय असणाऱ्या रामायण मालिकेतील अरुण गोविल यांच्यासोबत फोटो काढण्याची त्या मुस्लिम कुटूंबियाची इच्छा पूर्ण झाल्याचे दिसून येते.

पापाराझी विरल भयानीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन तो व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे. त्या व्हिडिओला नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळाली आहे. त्यावरील कमेंट बोलक्या आहेत. अनेकांनी त्यावर मुक्तपणे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काहींचे म्हणणे हीच खरी भारताची ओळख आहे. भारतील एकता, बंधूता आणि समता अशाप्रकारे नांदत असल्याचे अनेकांनी आपल्या कमेंटमधून सांगितले आहे.

खरं तो व्हायरल झालेला व्हिडिओ हा काही यंदाच्या वर्षातील व्हिडिओ नसून तो काही वर्ष जुना असल्याचे सांगण्यात येते. याबाबत एनबीटीनं सविस्तर वृत्त दिले आहे. अरुण गोविल यांच्यासोबतच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या आलेल्या कमेंट देखील वेगळ्याच चर्चेचा विषय आहे. सध्या राम मंदिर उद्घघाटन आणि प्राणप्रतिष्ठा यानिमित्तानं हा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

एका युझर्सनं त्या व्हिडिओवर कमेंट करताना असे म्हटले आहे की, हा खरा भारत आणि हा फोटो त्याची खरी ओळख आहे. मी मुस्लिम असून भगवद्गीता पूर्ण वाचून काढली आहे. आणि मला लहानपणापासून बॉलीवूडचे चित्रपट पाहत मी लहानाचा मोठा झालो आहे. हिंदू धर्मियांचा आदर आणि त्यांचे सणवार तितक्याच उत्साहानं साजरे केले आहेत.

Muslim Family Clicked Photo With Ramayan Ram Arun Govil
Ayodhya Ram Mandir : रामलल्लाचे दर्शन घ्यायचे असेल तर मंदिरात प्रवेश करण्याची वेळ आणि तारीख घ्या जाणून

दुसऱ्या युझर्सनं म्हटले आहे की, गेल्या कित्येक दिवसांपासून असा भारत पाहण्यासाठी मी आतूर झालो होतो. हा व्हिडिओ पाहून मी खूपच आनंदित झालो आहे. आम्ही सर्व एक आहोत. हा व्हिडिओ काही कुठल्या एकट्या धर्माचा नाही तो तर एकतेचे प्रतिक आहे. असे त्या दुसऱ्या युझर्सनं म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com