'माय नेम इज रागा'चा टीझर यु ट्युबवर व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

जो निर्भीडपणे अपयशाला सामोरे गेला त्या प्रत्येकाची ही गोष्ट आहे. प्रतिकूल वातावरणातही खंबीर राहून यश मिळवणे आणि लोकांची मने जिंकणे सगळ्यांनाच शक्य होत नाही.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या बायोपिकचा टीझर सध्या यु ट्युबवर व्हायरल होत आहे. 'माय नेम इज रागा' असे या सिनेमाचे नाव आहे. रुपेश पाल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

आपल्या चित्रपटाबद्दल बोलताना रुपेश म्हणाले की, ‘या सिनेमाचा उद्देश राहुल गांधी यांचे मोठेपण दाखवणे किंवा त्यांच्या आयुष्यातील इतर रहस्यांचा उलगडा करणे नाही. तर ही एका अशा व्यक्तीची गोष्ट आहे, ज्याचे नेहमीच हसू उडवले गेले. तरीही त्यांने कशापद्धतीने राजकारणात पुनरागमन केले याची ही गोष्ट आहे. जो निर्भीडपणे अपयशाला सामोरे गेला त्या प्रत्येकाची ही गोष्ट आहे. प्रतिकूल वातावरणातही खंबीर राहून यश मिळवणे आणि लोकांची मने जिंकणे सगळ्यांनाच शक्य होत नाही.’ निवडणुकांच्या काळात एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावरही चित्रपट तयार होत आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय या चित्रपटात नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My name is Raga teaser Viral on Youtube