esakal | मिंत्राचा नेमका लोच्या काय आहे, मिलिंद सोमण झाला ट्रोल

बोलून बातमी शोधा

myntra logo case actor milind soman has quirky take on the lette m}

 याप्रकरणी मुंबईतील एका महिलेनं तक्रार दिली असून तिनं म्हटलं आहे की, मिंत्रा चा लोगो हा महिलांसाठी आपत्तीजनक आहे.

मिंत्राचा नेमका लोच्या काय आहे, मिलिंद सोमण झाला ट्रोल
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडमधील चित्रपट आणि वेबसीरिज यावरुन वाद सुरु असलेला दिसून येतो. मात्र आता एका इ कॉमर्ससाठी प्रसिध्द असलेल्या वेबसाईटवरुन वादाला सुरुवात झाली आहे. मिंत्रा या प्रसिध्द इ कॉमर्स कंपनीच्या लोगोवरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्या वेबसाईटवर लोकांच्या भावनांशी खेळणे, त्यांना  भावनाविवश करणे आणि महिलांचा अपमान करणे या कारणांसाठी नेटक-यांनी ट्रोल केले आहे. त्यानंतर मिंत्रा सर्वांच्या टीकेचा विषय बनली आहे. अशातच बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता मिलिंद सोमण यानेही या वादात उडी घेतली आहे.

मिलिंद सोमणनं मिंत्रा ब्रँण्डवर चाललेल्या टीकेवर सोशल मीडियावर एक कमेंट दिली आहे. त्यात त्यानं लिहिलं आहे की, आता एम नावाचे अक्षर पहिल्यासारखे राहणार नाही. त्यात मिलिंदनं मिंत्राचे नाव घेतले नाही. मात्र एकीकडे मिंत्रावरुन चाललेला वाद दुसरीकडे मिलिंद सोमणनं केलेली टिप्पणी सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. काहीजण मिलिंदला ट्रोल करत आहे तर काहींनी त्याच्या टिप्पणीचे कौतूकही केले आहे.

यावर एक प्रसिध्द हेअर स्टायलिस्ट सपना भगनानीनेही व्टिट केले आहे. तिनं लिहिले आहे की, आपल्या नव्या ब्रँण्डच्या जाहिरातीसाठी मिंत्रानं जे पाऊल उचललं आहे ते कौतूकास्पद म्हणावे लागेल. काही जाहिरातीच्या गुरुंची त्यासाठी मदत घेतली गेली आहे. हा खेळ असाच पुढे सुरु ठेवा. पहिल्यांदा तनिष्क बरोबरही असेच केले आणि आताही तसेच. काही वादग्रस्त करण्याचा प्रयत्न. यातून मार्केटिंग करुन लोकांना फसविण्याचा प्रकार होत आहे.

 याप्रकरणी मुंबईतील एका महिलेनं तक्रार दिली असून तिनं म्हटलं आहे की, मिंत्रा चा लोगो हा महिलांसाठी आपत्तीजनक आहे. आणि त्यातून तिचा अपमान होत आहे. हे ही सांगावे लागेल. सायबर पोलिसांनी याविषयी सांगितले की, तक्रारीनंतर मिंत्रा सोबत एक बैठक घेण्यात आली आहे. त्यात कंपनीचे अधिकारी आले आणि तो लोगो बलणार असल्याचे सांगितले. त्यांनी याप्रकरणी एक मेलही पाठवला आहे. २००७ मध्ये सुरु झालेली मिंत्रा २०१४ मध्ये फ्लिपकार्डने खरेदी केली. मिंत्रा ही देशातीस सर्वात मोठी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट आहे.