Mon, Jan 30, 2023

Golden Globe Awards : RRR मधील 'नातू नातू' गाणं ठरलं 'सर्वोत्कृष्ट'; Golden Globe पुरस्कार जिंकला!
Golden Globe Awards : RRR मधील 'नाटू नाटू' गाणं ठरलं 'सर्वोत्कृष्ट'; Golden Globe पुरस्कार जिंकला!
Published on : 11 January 2023, 3:04 am
RRR चित्रपटातल्या नाटू नाटू या गाण्याने गोल्डन ग्लोब हा पुरस्कार पटकावला आहे. सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे.
एस एस राजामौली यांचं दिग्दर्शन असलेला RRR हा ब्लॉकबस्टर चित्रपट आणि त्यातलं नाटू नाटू हे गाणं जगभरात गाजलं. याच गाण्याने आता हॉलिवूडच्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असलेला हा गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावला आहे.
टेलर स्विफ्टचं कॅरोलिना, लेडी गागाचं होल्ड माय हँड या गाण्यांनाही नामांकन होतं. त्यातून नाटू नाटू या गाण्याची सर्वोत्कृष्ट ओरिजनल गाणं या प्रकारात निवड करण्यात आली आहे. RRR या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन इंग्लिश चित्रपट या प्रकारातही नामांकन मिळालं आहे.