Nagraj Manjule: टाळ्या आणि शिट्या.. नागराजनं चंद्रपूर पोलिसांना दाखवला 'घर बंदूक बिरयानी'चा ट्रेलर..

नागराज मंजुळे, सयाजी शिंदे घेतली चंद्रपूर पोलिसांची भेट..
Nagraj Manjule and sayaji shinde visit to chandrapur police station for screening ghar banduk biryani trailer
Nagraj Manjule and sayaji shinde visit to chandrapur police station for screening ghar banduk biryani trailersakal

Nagraj Manjule and sayaji shinde: सध्या जोरदार चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित 'घर बंदूक बिरयानी'.

मुळात नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके चित्रपट दिले आहेत. एका सर्वसाधारण विषयाला अनन्यसाधारण बनवणे, ही यांची खासियत आहे. हीच खासियत जपत आता लवकरच हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' प्रदर्शित होणार आहे.

यापूर्वीच या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले. या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर सोशल मीडियावर झळकला त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला गेली आहे. यात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

(Nagraj Manjule and sayaji shinde visit to chandrapur police station for screening ghar banduk biryani trailer)

Nagraj Manjule and sayaji shinde visit to chandrapur police station for screening ghar banduk biryani trailer
Prakash Raj Birthday: ३०० रुपये मानधनावर काम करायचे प्रकाश राज, आडनाव बदलंल आणि आज कमावतयात..

नागराज मंजुळे या सिनेमात पोलीस अधिकाऱ्याच्या डॅशिंग भूमिकेत दिसत आहेत. सिनेमाच्या प्रमोशनसाठी नागराज मंजुळे महाराष्ट्रात सगळीकडे फिरत आहेत. याच निमित्ताने त्याने नागराज आणि सयाजी यांनी चंद्रपूर पोलिसांची भेट घेतली.

'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाची संपूर्ण टीम चंद्रपूरमध्ये दाखल झाली असून, नागराज पोपटराव मंजुळे आणि सयाजी शिंदे यांनी नक्षलवाद्यांशी स्वतः दोन हात केलेल्या चंद्रपूरमधील C १६ बटालियनच्या पोलिसांशी संवाद साधून त्यांच्या सोबत वेळ घालवला.

'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना या बटालियनने खूप मजा केली असून, टाळ्या आणि शिट्यांच्या गजरात रांगडा पोलीस ऑफिसर नागराज पोपटराव मंजुळे आणि सदाबहार सयाजी शिंदे यांचे स्वागत केले. या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे यांनी अस्सल मातीतला, तडफदार पोलीस ऑफिसर अशी जबरदस्त भूमिका साकारली आहे.

हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. अत्यंत वेगळ्या धाटणीचा चित्रपट मराठीमध्ये वेगळा विषय आणि वेगळी ऊर्जा घेऊन येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com