Ghar Banduk Biryani: आधी गैरसमज.. अन् मग घट्ट मैत्री.. सयाजी शिंदे यांचं डाकू गँगशी काय आहे कनेक्शन.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagraj manjule talking about bonding between sayaji shinde and co-actors in ghar banduk biryani movie

Ghar Banduk Biryani: आधी गैरसमज.. अन् मग घट्ट मैत्री.. सयाजी शिंदे यांचं डाकू गँगशी काय आहे कनेक्शन..

Nagraj Manjule News: घर बंदूक बिरयानी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नागराज मंजुळे या सिनेमात पोलीस अधिकाऱ्याच्या डॅशिंग भूमिकेत दिसत आहेत.

नागराज सोबत या सिनेमात आकाश ठोसर, सयाजी शिंदे, सायली पाटील अशा कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाच्या प्रमोशनसाठी नागराज मंजुळे महाराष्ट्रात सगळीकडे फिरत आहेत. या चित्रपटातून नागराज पुन्हा एकदा वेगळा विषय घेऊन समोर येत आहे. त्यामुळे चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

या चित्रपटात एक डाकू गँगही आहे. या गँगचं आणि सयाजी शिंदे यांचं एक खास नातं आहे. त्याच विषयी नागराज मंजुळे एका मुलाखतीत बोलले आहेत.

(nagraj manjule talking about bonding between sayaji shinde and co-actors in ghar banduk biryani movie)

'घर बंदुक बिरयानी' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानची एक आठवण नागराज यांनी या मुलाखतीत सांगितली. ते म्हणाले, 'चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी सयादादा सेटवर आला. त्याचवेळी सेटवर सिनेमात काम करणाऱ्या मुलांची गँग देखील तिथं होती. ते सर्वजण एका बाजूला बसले होते.'

'सयादादानं त्यांना पाहिलं. त्याला वाटलं की आसपासच्या गावातील आदिवासी लोकं चित्रीकरण पाहण्यासाठी आले आहेत. सयादादानं या मुलांना सेटवरून बाहेर काढा असं सांगितलं. नंतर सयादादाला कळलं ही मुलं सिनेमात काम करण्यासाठी आली आहेत. त्यानंतर सयादादा आणि या मुलांमध्ये खूपच घट्ट मैत्री झाली.'

सयाजी यांची एक डाकू गँग या सिनेमात आहे, त्याच गँगमध्ये काम करण्याासाठी हे तरुण आले होते. त्यांच्याबद्दस सयाजी यांना आधी गैरसमज झालेला आणि आता त्यांच्यात चांगली मैत्री झाल्याचे नागराज यांनी सांगितले.

या सिनेमात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सायली पाटील आणि दीप्ती देवी हे प्रमुख भूमिकेत आहेत. शिवाय नागराज क्रिएटिव्ह डिरेक्टर असून दिग्दर्शन हेमंत अवताडे यांनी केलं आहे. या निमित्तानं एक वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या ७ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.