Namrata Sambherao: जड पावलांनी निरोप घेताना.. नम्रताच्या पोस्टनं वेधलं लक्ष्य..

समीर, विशाखा आणि पॅडीहीला घेऊन नम्रता निघाली अमेरिकेला.. कारणही आहे तसंच खास..
Namrata Sambherao shared post about She is going to America with vishakha subhedar prasad khandekar pandharinath kamble for  play drama kurrr
Namrata Sambherao shared post about She is going to America with vishakha subhedar prasad khandekar pandharinath kamble for play drama kurrrsakal

Maharashtrachi Hasyajatra fame namrata sambherao: गेल्या काही वर्षात सोनी मराठी वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले आहे. या कार्यक्रमातील एक अविभाज्य घटक म्हणजे 'नम्रता संभेराव'.

तिनं साकारलेली 'लॉली' असो, 'आई' असो किंवा नुकतेच सर्वांसमोर आलेले 'पावली' हे पात्र असो. तिच्या प्रत्येक भूमिकेनं आपल्याला हसवलं आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

विशेष म्हणजे, ती आपल्या बाळा विषयी म्हणजे रुद्र विषयी खूप लिहीत असते. शूटिंग मुळे त्याला वेळ देता येत नाही याबाबतही ती अनेकदा बोलत असते. आजही तिच्या एका पोस्टनं लक्ष वेधलं आहे. चक्क महिन्या भरासाठी ती आपल्या बाळाला सोडून बाहेर चालली आहे.

(Namrata Sambherao shared post about She is going to America with vishakha subhedar prasad khandekar pandharinath kamble for play drama kurrr)

Namrata Sambherao shared post about She is going to America with vishakha subhedar prasad khandekar pandharinath kamble for  play drama kurrr
Sharad Ponkshe: अजूनही काँग्रेसला सावरकरांची भीती.. शेंबडं पोरगं म्हणत राहुल गांधींवर पोंक्षेंची टीका..

यावेळी नम्रताने एक खास पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये ती का चालली, कुठे चालली याची माहीती देत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवाय आपल्या नवऱ्यासोबत आणि मुलासोबत एक विमानतळावरील एक छानसा फोटोही शेयर केला आहे.

या पोस्टमध्ये नम्रता म्हणते, ''निघालो साता समुद्रापलीकडे फॅमिली पासून दूर महिनाभर लेकरापासून लांब चाललेय जड पावलांनी निरोप घेताना ऊर भरून आला होता पण हरकत नाही नाटकाचा अमेरिका दौरा यशस्वीरीत्या पार करून येऊच लवकर तूर्तास.. बाय बाय.. ''

यावेळी नम्रतासोबत विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर आणि पंढरीनाथ कांबळे देखील दिसत आहे. या चौघांचाही पूर्ण परिवार सोबत दिसत आहे. तर हे चौघे त्यांच्या 'कुर्ररर' या नाटकाच्या निमित्ताने अमेरिका दौऱ्यावर चालले आहेत. जवळपास एका महिन्याचा हा दौरा आहे.

गेल्या वर्षी 'कुर्ररर' हे नाटक आपल्या भेटीला आलं. सध्या या नाटकाची बरीच चर्चा आहे. या नाटकाचे लेखन दिग्दर्शन प्रसाद खांडेकरनेच केलं असून विशाखा सुभेदार या नाटकाची निर्माती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com