Namrata Sambherao: "हा निर्णय मी...!" 'कुर्ररर' नाटक सोडल्याचं खरं कारण नम्रताने सांगितलं

विशाखा सुभेदार यांची निर्मिती असलेलं कुर्ररर नाटक का सोडलं, याचं कारण नम्रताने सांगितलं
namrata sambherao talk about why she exit from marathi natak kurrr
namrata sambherao talk about why she exit from marathi natak kurrr SAKAL

Namrata Sambherao News: काही दिवसांपुर्वी कुर्ररर नाटकातून अभिनेत्री नम्रता संभेराव आणि अभिनेता प्रसाद खांडेकरने एक्झिट घेतली. रंगभूमीवर चांगल्या सुरु असलेल्या नाटकामधून नम्रता - प्रसादने काढता पाय घेतला. या दोघांच्या अचानक नाटक सोडण्याने अनेकांना धक्का बसला.

अशातच आता नम्रता संभेरावने सोशल मीडियावर नाटक का सोडलं, याचा खुलासा केलाय. नम्रताने खरं कारण सांगत कुर्ररर नाटकातील एक्झिटबद्दल भाष्य केलंय.

namrata sambherao talk about why she exit from marathi natak kurrr
Vinamra Bhabal Wedding: 'मन उडू उडू झालं' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्याचं थाटामाटात लग्न

नम्रताने सोशल मीडियावर याबद्दल लांबलचक पोस्ट लिहीली आहे. ही पोस्ट लिहून नम्रता लिहीते, "कुर्रर्रर्र ह्या नाटकातली माझी भूमिका पूजा I will miss u so much
माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचं नाटक . माझी भूमिका मी अक्षरशः जगले . माझ्या आयुष्यातलं अभिनयाचं पहिलं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस ह्याच नाटकाने मिळवून दिलं मला. कोविड काळानंतर आम्ही कलाकारांनी एकमेकांच्या विश्वासावर उभं केलेलं हे नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं प्रेम केलं , अत्यंत व्यस्त schedule मधून आम्ही कुर्रर्रर्र ह्या नाटकाचे 2वर्षात 200हुन अधिक प्रयोग केले."

नम्रता पुढे लिहीते, "पण व्यस्त तारखांमुळे प्रयोगांची संख्या कमी झाली backstage आणि सहकलाकारांना जास्तीत जास्त प्रयोग करता यावेत आणि नाटकाचे आणखी भरघोस प्रयोग व्हावे ह्यासाठी सर्वानुमते घेतलेला हा निर्णय आहे. काळजावर दगड ठेवून घेतलेला निर्णय काय असतो पहिल्यांदा अनुभवला पण हा निर्णय चांगल्या भावनेने घेतला गेला आहे नाटकासाठी च घेतला आहे आणि तुम्ही रसिक प्रेक्षक आमच्या निर्णयाचा मोठ्या मनाने स्विकार कराल अशी खात्री आहे. ह्यापूर्वी जसं प्रेम केलंत तसंच प्रेम तुम्ही रसिक प्रेक्षक आमच्या कुर्रर्रर्र ह्या नाटकावर नवीन संचावर कराल अशी आशा आहे."

नम्रता शेवटी लिहीते, "मी अजूनही आमच्या म्हणतेय कारण शारीरिक रित्या exit घेतली तरी त्या नाटकाशी मी मनाने जोडले गेलेय , तिथून कधीच exit होत नसते . माझ्या शुभेच्छा कायम सोबत असतील. जिची खरंच कुठे शाखा नाही अशी विशाखा ताई विनोदाचा बाप पॅडी दादा माझी अत्यंत जवळची मैत्रीण मयुरा रानडे आणि supreme प्रियदर्शन दादा तुम्हाला व कुर्रर्रर्र च्या सर्व टीम ला पुढील प्रयोगांसाठी housefull शुभेच्छा. रंगमंचापासून फार काळ लांब राहूच शकत नाही. भेटू लवकरच ........."

कुर्ररर नाटकात नम्रता - प्रसादच्या जागी आता अभिनेता प्रियदर्शन जाधव आणि अभिनेत्री मयुरा रानडे यांची एन्ट्री झालीय. याशिवाय या नाटकात विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे सुद्धा काम करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com