'सच जानकर भी कबुल नही मुझे.'; नाना पाटेकरांचा 'The Confession' संवाद चर्चेत Nana Patekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patekar In 'The Confession'

'सच जानकर भी कबुल नही मुझे.'; नाना पाटेकरांचा 'The Confession' संवाद चर्चेत

आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी बॉलीवूड(Bollywood)मध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारे अभिनेते नाना पाटेकर(Nana Patekar) यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. २०१८ मध्ये 'Me Too' मोहिमे अंतर्गत अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्तानं लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले होते. त्यानंतर जवळ-जवळ तीन-चार वर्षांनी नाना पाटेकर मोठ्या पडद्यावर परत येत आहेत. ते सोशल थ्रीलर सिनेमा 'द कन्फेशन'(The Confession) मध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या सिनेमाचा मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे.

हेही वाचा: 'आदिपुरुष' मध्ये प्रभासचा 'राम अवतार'; दिग्दर्शकाची 'रामनवमी'ला खास पोस्ट

ट्वीटर वर ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी एक मोशन पोस्टर पोस्ट करीत नाना पाटेकर मोठ्या पडद्यावर लवकरच परत येतायत अशी घोषणा केली आहेत. त्यांनी जो मोशन पोस्टर शेअर केला आहे,ज्यात नाना पाटेकर यांचा दमदार आवाज ऐकायला मिळत आहे. नाना म्हणतायत,''सत्याचा चेहरा मी पाहिला,सत्याचा आवाज पण ऐकला, सत्य समोर आलं तरी मला ते मान्य नाही,यात मला मरण आलं तरी ते मान्य आहे मला. नाना पाटेकर यांचा ऑडिओ जिथे संपतो तिथे नाना पाटेकर यांना देखील आपण पाहू शकतो.

Taran Adarsh Twitter post

Taran Adarsh Twitter post

या सिनेमाचं दिग्दर्शन अनंत नारायण महादेवन यांनी केलेलं आहे. तर,नरेंद्र हीरावत, प्रवीण शहा,सगुन बाघ,अजय कपूर आणि सुभाष काळे या 'द कन्फमेशन' सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या सिनेमाच्या निमित्तानं नाना पाटेकर अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर परत येतायत. त्यामुळे त्यांच्या सिनेमाच्या मोशन पोस्टरला पाहून त्यांचे चाहते मात्र सुखावले आहेत.

हेही वाचा: 'विवाहित पुरुष तरुण मुलींना कसे फसवतात'; कंगनानं सांगितलं 'हृतिक स्कॅंडल'

नाना पाटेकर २०१८ मध्ये रजनीकांत यांच्या 'काला' सिनेमात दिसले होते. या सिनेमात त्यांनी खलनायकाची व्यक्तिरेखा साकारली होती. २०१९ मध्ये 'हाऊसफुल ४' चं शूटिंग करायला त्यांनी सुरुवात केली होती पण तनुश्री दत्तानं Mee Too प्रकरणात त्यांचं नाव घेऊन त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते,तेव्हा त्यांनी सिनेमा अर्ध्यातच सोडला होता. त्यानंतर आता तीन-चार वर्षांनी ते 'द कन्फेशन' सिनेमात दिसणार आहे.

Web Title: Nana Patekar New Movie The

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top