निळू फुले अन् श्रीराम लागू यांच्या मदतीमुळे दाभोळकरांनी 'अंनिस' उभं केलं

मराठी सिनेसृष्टीतील हे दिग्गज कलाकार नेहमी समाज उपयोगी कार्यासाठी उभे राहत.
Nilu Phule, Shriram Lagoo And Narendra Dabholkar
Nilu Phule, Shriram Lagoo And Narendra Dabholkaresakal

Narendra Dabholkar, Nilu Phule And Shriram Lagoo : वर्ष १९८९ मध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीपासून वेगळे होऊन दाभोलकरांनी 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ची स्थापन केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून नरेंद्र दाभोलकरांनी समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढींचं उच्चाटन करण्याण्यासाठी व्याख्यान व सभांच्या माध्यमातून लोकप्रबोधन केले.

महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकरांनी अनेक वर्षे कार्य केले होते.यासाठी ते सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजूने सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम करीत होते.

समाजातील अनेक भोंदू बाबांची फसवेगिरी दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ( Maharashtra Andha Shraddha Nirmulan Samiti) कार्यकर्त्यांनी विविध प्रयोग व प्रात्यक्षिक दाखवून लोकांसमोर उघडकीला आणले होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दरवर्षी एका मान्यवरांना ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार देऊन गौरविते. (Narendra Dabholkar Set Up Anis With Help Of Nilu Phule And Shriram Lagoo)

Nilu Phule, Shriram Lagoo And Narendra Dabholkar
निळू फुले: खलनायकी मुखवट्यामागचा सच्चा माणूस!

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेले ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ हे मासिक गेली अनेक वर्षे सांगलीतून प्रसिद्ध होत आहे. ते महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून आजही प्रसिद्ध आहे. याचे वर्गणीदार करण्याचे काम अंनिसचे कार्यकर्ते विनामोबदला करीत असतात.

सर्वव्यापी सामाजिक कार्य : डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) यांचे सामाजिक कार्यासाठीचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी अंधश्रद्धेच्या विरोधात उभारलेला लढा व त्यासाठी जनसामान्यांमध्ये केलेल्या जनजागृतीला तोड नाही. बाबा आढाव यांच्या 'एक गाव-एक पाणवठा' या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतरच्या काळात श्याम मानव यांनी स्थापन केलेल्या 'अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती'साठी कार्य सुरू केले.

महाराष्ट्रामध्ये विविध पुरोगामी चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्त्यांना काही अल्प मानधन देता यावे म्हणून एक मोठा निधी उभा करण्यासाठी ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ या संस्थेची स्थापना झाली. त्याच्या पहिल्याच अध्यक्षपदी डॉ. श्रीराम लागू (Shriram Lagoo), तर सचिवपदी डॉ. दाभोलकर होते.

Nilu Phule, Shriram Lagoo And Narendra Dabholkar
...म्हणून विजय तेंडुलकर, डॉ. श्रीराम लागू नाट्य संमेलनाध्यक्षपदाला मुकले 

या संस्थेसाठी निधी उभारण्यासाठी डॉ. लागूंसह निळू फुले (Nilu Phule), सदाशिव अमरापूरकर, रीमा लागू, रोहिणी हट्टंगडी या कलाकरांनी विनामानधन ‘लग्नाची बेडी’ हे नाटक सर्व महाराष्ट्रभर केली. या नाटकाचा फायदा या निधीसाठी दिला. तरीही अजून पैशाची गरज होती, म्हणून डॉ. दाभोलकरांनी शाळेतील विद्यार्थ्यांकडून निधी संकलन करण्याची कल्पना मांडली. या कार्यक्रमाला ‘एक उपवास कृतज्ञतेचा’ हे नाव दिले. विद्यार्थ्यांनी एक वेळ उपवास करून त्यातून वाचलेले ५ रुपये या निधीसाठी द्यावेत, अशी ही कल्पना होती.

यासाठी डॉ. लागूंना घेऊन दाभोलकरांनी सातारा जिल्ह्यातील ६०० मुख्याध्यापकांची बैठक बोलावून या कामासाठी मुख्याध्यापकांना राजी केले. डॉ. लागू या बैठकीला उपस्थित राहिल्यामुळे सर्व मुख्याध्यापकांनी हे काम आनंदाने करण्याचे ठरविले आणि सातारा जिल्ह्यातून त्याकाळी चक्क २५ लाखांचा निधी जमा झाला. आपल्या प्रसिद्धीवलयाचा उपयोग सामाजिक कामासाठी करू देणारे डाॅ. लागू हे एक आमच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते, असे डाॅ. दाभोलकर सांगत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com