Prakash Raj: 'मोदीजी काय आहे ही नवी नग्नता'? प्रकाश राज यांचा संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash Raj

Prakash Raj: 'मोदीजी काय आहे ही नवी नग्नता'? प्रकाश राज यांचा संताप

Narendra Modi PM Prakash Raj Bollywood Actor: आपल्या भूमिकेवर ठाम राहून नेहमीच समाजातील वेगवेगळ्या गोष्टींवर तितक्याच आक्रमकपणे भूमिका मांडणाऱ्या प्रकाश राज यांचा चाहतावर्ग मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून ते भलतेच आक्रमक झाले आहेत. ते सध्या त्यांच्या एका पोस्टमुळे चर्चेत आले आहे. त्यात त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली आहे. यावरुन प्रकाश राज यांना ट्रोल करण्यात आले आहे.

यापूर्वी राज यांनी मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र सध्या त्यांचे ट्विट मोदी समर्थकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे त्यांच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली जात आहे. ते ट्विट वाचल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. राज यांनी काहीही झालं तरी आपण जे काही बोललो आहोत त्याविषयी आक्रमकपणे भूमिका मांडली आहे.

प्रकाश राज यांनी मोदी यांच्या वीस फोटोंचे एक कोलाज तयार केले आहे. त्यावरुन त्यांनी केलेलं ट्विट हे चर्चेत आलं आहे. त्यामध्ये त्यांनी जे काही लिहिलं आहे याचा सोशल मीडियावर कडाडून निषेध केला जात आहे. मोदीजी आपण आणखी किती फोटो शेयर करणार आहात. आपण शेयर करत असलेले फोटो हे नव्या नग्नतेवर भाष्य तर करत नाहीत ना अशा प्रकारची टिप्पणी राज यांनी केली आहे,

फोटो शेअर करताना कॅप्शनसाठी प्रकाश राज यांनी वापरलेल्या शब्दांवरून अनेकांनी आक्षेप घेतला आहे. राज यांनी ‘न्यूडीटी’ हा शब्द अपयश लपवणे या अर्थाने वापरण्यात आला आहे. “ओव्हर ड्रेसिंग ही नवीन नग्नता आहे,” असं कॅप्शन प्रकाश राज यांनी दिलंय. गरीमा माथुर नावाच्या युझर्सनं लिहिलं आहे की, प्रकाश राज आम्ही तुमच्या अभिनयाचे फॅन आहोत. तुमचा नेहमीच आदरही करतो. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी मोदींवर टीका करता तेव्हा काही गोष्टींचे भान ठेवण्याची गरज आहे.

हेही वाचा: Aliya-Ranbir’s daughter: 'राहा'बाबत आलिया अन् रणबीरचा मोठा निर्णय!

मोदीविषयी जे काही बोलले जात आहे त्याकडे तुम्ही लक्ष देऊच नका. तुम्ही गेल्या काही दिवसांपासून मोदीजींवर टीका करत आहात. एकवेळ ठीक आहे. मात्र सातत्यानं टीका करणे काही ठीक नाही. असे त्या युझर्सनं म्हटले आहे. मोदींनी ट्विटरवर वेगवेगळ्या पारंपारिक वेशभूषेतील पंतप्रधान मोदींचे फोटो शेअर करून खिल्ली उडवली आहे. या ट्वीटमध्ये काही युजर्सनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.