पोस्टर पाहूनच थरकाप.. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अमर देवकरची घोषणा..

राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'म्होरक्या’ या चित्रपटाचा दिग्दर्शक अमर देवकर घेऊन येतोय नवा चित्रपट..
national award winner mhorkya film director amar deokar announces his new movie he shared poster
national award winner mhorkya film director amar deokar announces his new movie he shared poster sakal
Updated on

Amar Deokar : 'म्होरक्या' चित्रपटामुळे चर्चेत आलेला दिग्दर्शक म्हणजे अमर देवकर. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने या चित्रपटाची आणि अमरची बरीच चर्चा झाली. आता अमर एक नवा चित्रपट घेऊन आला आहे. या चित्रपटाचे नाव जाहीर झाले नसले तरी चित्रपटाचे पोस्टर पाहून अनेकांचे डोळे फिरले आहेत. अमरने हे पोस्टर सोशल मीडियावर शेयर केले आहे. (national award winner mhorkya film director amar deokar announces his new movie he shared poster)

‘म्होरक्या’ (Mhorkya) या चित्रपटाला ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला. विशेष उल्लेखनीय कामगिरी आणि उत्कृष्ट बालचित्रपट या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. या चित्रपटाचा दिग्दर्शक अमर देवकर (Amar Deokar) आता आणखी एक हटके चित्रपट घेऊन येणार आहे. नुकतीच त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. अमरने आपल्या चित्रपटाचे पोस्टर शेयर केले आहे मात्र, हे पोस्टर पाहून प्रेक्षकांना काहीसा धक्का बसला आहे. या पोस्टरमध्ये एक हत्यार दिसत आहे. सोबतच या पोस्टरमध्ये हत्याराच्या आजूबाजूला काही रक्ताचे ओघळ दिसत आहेत. या हत्यारामागे चित्रपटाचं नाव लपलेलं आहे. आता हे नाव नेमकं काय असेल, चित्रपट कोणत्या विषयावर असेल हे मात्र आगामी काळात कळेल.

बार्शी सारख्या ग्रामीण भागातून येऊन अमर देवकर याने आपले दिग्दर्शनाचे स्वप्न साकारले आहे. अमर या आधीही एकदा चर्चेत आला होता. कारण गेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावेळी देशातील अनेक दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मंत्र्यांच्या हातून घेण्यास नकार दिला होता. राष्ट्रपतींऐवजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुरस्कार देणार हे कळल्यानंतर अनेक लोकांनी हे पुरस्कार त्यावेळी नाकारले होते. त्या सर्वांना भारत सरकारने पोस्टाने पुरस्कार पाठवून दिले होते. यामध्ये अमर देवकरचाही सहभाग होता. विशेष म्हणजे ज्यावेळी पोस्टमन राहुल पवार यांनी पुरस्कार घरी आणून दिला त्यावेळी अमरनी त्यांचा पोशाख देऊन सन्मान केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com