६८ व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांची बाजी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

these marathi movie won national film award 2022

६८ व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांची बाजी..

68th National Film Awards : मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत मनाचा समजला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर करण्यात आला. कलाकार आणि सिनेसृष्टीतील मंडळी या पुरस्कारची आतुरतेने वाट पाहत असतात. शुक्रवारी ४ वाजता यंदाचा ६८ वाराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा सोहळा दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. यंदाच्या पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनीही आपले नाव कोरले. (marathi movie in national film award 2022) (funral won best social movie in national film award)

यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती प्रेस इनफॉर्मेशन ब्युरोच्या अधिकृत ट्विटर पेजवरून देण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी दरवर्षी हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढ़ी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना नामांकन दिली जातात.

चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. यंदा अनेक मराठी चित्रपटही या स्पर्धेत अग्रेसर ठरले. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा किताब शास्रीय गायक राहूल देशपांडेला प्राप्त झाला. 'मी वसंतराव' या चित्रपटासाठी हा पुरस्कार देण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा पुरस्कार शंतनू रोडे दिग्दर्शित 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाला मिळाला. याशिवाय सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून 'फनरल' या चित्रपटाला गौरविण्यात आले. तर अमोल गोळे दिग्दर्शित 'सुमी' हा सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरला.

तर वैयक्तिक पुरस्कारांमध्ये 'अनिश गोसावी' याला 'टकटक' या चित्रपटासाठी आणि 'आकांक्षा पिंगळे', 'दिव्येश इंदुलकर' यांना सुमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पारितोषिक मिळाले. तर विशेष उल्लेखनिय फिचर फिल्म हा पुरस्कार सिद्धार्थ मेननचा 'जून', 'गोदाकाठ' आणि किशोर कदम यांचा 'अवांछित' या तीन मराठी चित्रपटांना प्राप्त झाला.