
मुंबई - साऊथ मुव्ही इंडस्ट्रीमध्ये जे काही प्रसिध्द अभिनेते आहेत त्यात धनुषचेही नाव घ्यावे लागेल. रजनीकांतचा जावई एवढीच काय ती त्याची ओळख नाही तर तो सर्वोत्तम अभिनेता आहे हे त्यानं आपल्या अनेक प्रकारच्या भूमिकेतून दाखवून दिलं आहे. त्याच्या असुरन चित्रपटातील भूमिकेचा देशपातळीवर गौरव करण्यात आला आहे. त्याबद्दल त्याला सन्मानित करण्यात आला आहे. यामुळे कोट्यवधी फॉलोअर्स असणा-या धनुषच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. असे म्हणता येईल. जात, धर्म, वर्ण वर्चस्वाची लढाई ही काही शेवटपर्यत संपता संपत नाही. त्याला धाडसानं तोंड देऊन आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचं काम काहीजण करत असतात. असुरनमध्ये हे प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. त्याला धनुषनं पूर्णपणे न्याय दिला आहे.
या अगोदर असुरन चित्रपटासाठी धनुषला दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरविण्यात आले होते. त्या चित्रपटामध्य़े केलेल्या भूमिकेमुळे धनुषचा सन्मान मिळाला होता. आता त्याला असुरन मधील भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाची भावना आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात धनुषला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या त्या चित्रपटाला बेस्ट तमिळ फिल्मचा देखील अॅवॉर्ड मिळाला आहे.
67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आणि धनुषच्या चाहत्यांनी आनंद साजरा केला. त्याला कारणही तसेच होते. ते म्हणजे त्यांच्या आवडत्या कलाकाराला सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे पूर्ण साऊथमध्ये मोठ्या प्रमाणात तो आनंद साजरा करण्यात आला. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या असूरन चित्रपटासाठी धनुषला गौरविण्यात आले आहे. त्याच्या एका आगळ्या वेगळ्या प्रकारच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.
असुरन काय आहे, याबाबत थो़डक्यात सांगायचे झाल्यास असे सांगता येईल की, अद्यापही आपल्यातून जातीयवाद काही केल्या पूर्णपणे गेलेला नाही. ते या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. हा चित्रपट समाजातील जात वास्तवावर प्रकाश टाकतो. उच्च जात आणि कनिष्ठ जात यातील फरक अधोरेखित करतो. धनुषनं या चित्रपटात अशा एका बापाची भूमिका साकारली आहे ज्याच्या मुलानं एका वरिष्ठ जातीतील कुणाची हत्या केली आहे. त्यामुळे त्याला वाचविण्यासाठी बापाचा कौटूंबिक, सामाजिक संघर्ष या चित्रपटात मांडण्यात आला आहे. या चित्रपटाचं प्रेक्षकांनी कौतूक केलं. समीक्षकांनीही धनुषला शाबासकी दिली. आपल्या मुलाला वाचविण्यासाठी धनुषला ते गाव सोडावे लागते. ते का, हे पाहण्यासाठी आणि धनुषचा अभिनय मनात साठवण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.
धनुषचा संपूर्ण त्या जातीविरोधात असलेला लढा प्रचंड वेदनामयी आहे. त्यात अथक संघर्ष आहे. बदला घेण्यासाठी सगळ्या एकवटलेल्या उच्च जातीच्या लोकांशी लढताना धनुषला मोठ्या संकंटांना तोंड द्यावे लागते. या चित्रपटाचे दिग्दर्शन वेत्रिमारन यांनी केले आहे. चौथ्यांदा धनुषला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यापूर्वी त्याला 2010 मध्ये आडुकलम, 2014 आणि 2015 मध्ये सहनिर्मात्या रुपानं त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. धनुषनं वडिलांच्या थुलुवधो इलमई चित्रपटातून त्यानं आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. धनुषनं साऊथच्या चित्रपटांसोबत काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.