National Youth Day 2024 : 'जिंदगी जीने के दो ही तरीके होते हे, पहला...' ! युवा दिनाच्या निमित्तानं 'हे' चित्रपट पाहायलाच हवेत

जगण्याचं भान तुम्हाला नव्यानं देणारे बॉलीवूडमधील काही चित्रपट हे तरुणाईनं आवर्जून पाहावेत असेच आहेत.
National Youth Day 2024 top bollywood movie
National Youth Day 2024 top bollywood movie esakal

National Youth Day 2024 top bollywood movie : जगण्याचं भान तुम्हाला नव्यानं देणारे बॉलीवूडमधील काही चित्रपट हे तरुणाईनं आवर्जून पाहावेत असेच आहेत. त्यामधील तरुणाईला भावणारे विचार, काही विशिष्ट प्रतीकं आणि प्रतिमा, खास संवाद हे त्यांना प्रेरणा देणारे आहेत. आजच्या राष्ट्रीय युवा दिवसाच्या निमित्तानं आपण बॉलीवूडमधील त्या प्रेरणादायी चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्तानं देशभरामध्ये हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या तेजस्वी विचारांसाठी केवळ भारतच नाही तर जगभरामध्ये ज्यांच्या नावाला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली त्या विवेकानंदाच्या विचारांचा जागर या दिनाच्या निमित्तानं केला जातो. चित्रपटातूनही युवा वर्गाला प्रेरणादायी विचार देण्याबरोबरच त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येते.

१. छिछोरे -

बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा छिछोरे नावाचा चित्रपट हा तरुणाईसाठी आयडियल मानला जातो. दुर्देवानं या चित्रपटातून सकारात्मकतेचे धडे देणारा सुशांतनं त्याला काही कारणास्तव मात्र त्याच्या आयुष्यातील सकारात्मकता सापडली नाही. त्यामुळे त्यानं टोकाचं पाऊल उचलले. सुशांतनं या चित्रपटातून तरुणाईला दिलेला संदेश हा नेहमीच वेगळी शिकवण देणारा ठरला आहे. नितेश तिवारीनं या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

२. १२ वी फेल - यंदाच्या वर्षात आयएमडीबीवर विधू विनोद चोप्रा यांच्या या चित्रपटानं कमाल केली आहे. त्यानं ख्रिस्तोफर नोलानच्या जगप्रसिद्ध अशा ओपनहायमर या चित्रपटाला मागे टाकले आहे. चंबळच्या खोऱ्यातून आलेल्या मनोज तिवारी नावाचा विद्यार्थी जो कुणी एकेकाळी बारावी नापास झालेला असतो, तोच भविष्यात मोठा सनदी अधिकारी होतो. त्याचा हा प्रवास दिग्दर्शकानं प्रभावीपणे मांडला आहे. विक्रांत मेस्सीनं त्यात जबरदस्त अभिनय केला आहे.

३. जिंदगी न मिलेगी दोबारा

फरहान अख्तर, अभय देओल अन् ह्रतिक रोशन यांच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन झोया अख्तरनं केलं होतं. त्यात तीन मित्रांची गोष्ट मोठ्या खुबीनं मांडण्यात आली होती. पैसा म्हणजे सर्वस्व नाही. तुम्ही तुमच्या स्वतासाठी वेळ देत तुमच्याशी जोडलेल्या गोष्टींना तितकेच महत्व द्यायला हवे. असेही त्यातून सांगण्यात आले होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला मोठं यश मिळालं होतं

४. जाने तू या जाने ना

२००८ मध्ये आलेल्या या चित्रपटातील पप्पु कांट डान्स साला....नावाचे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते. रहमानच्या कंपोझिशनचं चाहत्यांनी कौतुक केलं होतं. चार मित्रांची गोष्ट, त्यांच्यातील बाँडिंग आणि शेयरिग, वेगळ्या मित्रत्वाची गोष्ट या चित्रपटातून इमरान खाननं डेब्यू केलं होतं. त्यात जेनेलियाच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं.

५. रंग दे बसंती

प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या रंग दे बसंतीचे नाव हे नेहमीच युथ टॉप वॉचिंग मुव्हीजमध्ये घेतले जाते. २००६ मध्ये आलेल्या या चित्रपटानं एक नवा ट्रेंड सेट केला होता. तरुणाई, तिची स्वप्नं, तिची विचार करण्याची पद्धत या वर वेगळ्या प्रकारे भाष्य करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला होता. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यात आमिर खानच्या भूमिकेनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

६. उडाण -

विक्रमादित्य मोटवानीच्या उडाण या चित्रपटाला केवळ बॉलीवूडच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मोठी वाहवा मिळाली होती. त्यात दोन भावांची प्रेरणात्मक गोष्ट मांडण्यात आली होती. सहकार्य, प्रेम, आदर, तीव्र इच्छाशक्ती आणि प्रेम या सारख्या गोष्टींवर दिग्दर्शकानं प्रभावीपणे भाष्य या चित्रपटाच्या निमित्तानं केलं होतं.

National Youth Day 2024 top bollywood movie
Kangana Ranaut: भाजप समर्थक आहे म्हणून? कंगणाच्या बिल्किस बानोवरील चित्रपटाला जिओ देत नाहीय परवानगी!

७. टू स्टेट्स-

रिलेशनशिप आणि रिलेशनशिप मध्ये आल्यानंतर येणारी जबाबदारी, ती पार पाडण्यासाठी घेततेली भूमिका यावर टू स्टेटसमधून खुमासदारपणे भाष्य करण्यात आले आहे. अर्जुन कपूर आणि आलिया भट्टच्या या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर मोठं कौतुक झालं होतं. त्यानं मोठी कमाई करुन प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com